Monday, May 30, 2011

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

एखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी

माझ्यासाठी थांबलेली

माझ्या भेटीसाठी आसुसलेली


 

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास

माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी

माझे एकाकीपण संपवणारी

माझ्या सुखात सहभागी होणारी

माझे दुखः आपले मानणारी


 

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

मला मी आहे तसेच स्वीकारणारी

मला समजून घेणारी

सावली सारखी सतत

माझ्याबरोबर राहणारी

माझ्या साठीच जगणारी'


 

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास.......

बऱ्याच वेळा भेटलोही असेनही कदाचित

नजरेतूनच मनातील भावना ओळखणारी

तरी सुद्धा द्विधा (confused) मनस्थितीत असणारी


 

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

ती माझ्या हृदयातील

फक्त तिच्यासाठीच

राखीव ठेवलेली खास

जागा भरणारी


 

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

कदाचित आता ह्या क्षणी

हि कविता वाचत देखील असेल

अन हि कविता वाचून

खुदकन हसून म्हणणारी

अरे वेड्या मीच मीच ती

तुझ्या स्वप्नात येणारी

आणि फक्त तुझ्याच

एका इशार्याची वाट पाहणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

असेलच ना कुठेतरी कोणीतरी माझ्याचसाठी ती एक खास.

प्रेम केलं होतं काही देण्यासाठी

"प्रेम केलं होतं काही देण्यासाठी,

प्रेम केलं नव्हतं काही मिळवण्यासाठी,

प्रेम केलं होतं आठवणी तुझ्या राहण्यसाठी,

प्रेम केलं नव्हतं विसमरणात पडण्यासाठी,

प्रेम केलं होतं सौख्य देण्यासाठी,

प्रेम केलं नव्हतं दारिद्रय उपभोगण्यसाठी ,

प्रेम केलं होतं तुझ्या श्वाससाठी,

प्रेम केलं नव्हतं सर्वस्व गमवण्यासाठी,

प्रेम केलं होतं तुझ्या विरोधात अढळ स्थान मिळवण्यासाठी,

प्रेम केलं नव्हतं कोनाड्यात बसून एकटच रडण्यासाठी !"

प्रेम नको..

प्रेम नको..

खरचं यार प्रेम बिम काही नको...

बस...आता सगळं पुरे झालं..

कोणासाठी तिष्ठणं नको...

आजवर झालेलं पुरे झालं..

डोळ्यांत दाटलेलं पाणी नको..

अन आभाळात ओघळता मेघ नको

रात्र रात्र जागणं नको...

त्याच जुन्या पायवाटांवर चालणं नको..

बस...आता सगळं पुरे झालं..

आता प्रेम बिम काही नको...

उगाचच लिहीणं काहीही...निरर्थक..

उगाचचं वाचणं...तेच...पुन्हा पुन्हा..

आता ह्यातलं.. काहीच नको

बस...बस..मी अन मीच..

बाकी प्रेम बिम काहीच नको

माझ्या विरहात तू ही जळत

मनातल्या मनात तू ही कित्येक स्वप्ने रंगवत असशील

माझ्याच विचारात या स्वप्नांच्या जगात हरवत असशील

माझ्या सहवासाचे क्षण आठवून रात्र-रात्र जागत ही असशील

'माझेही तुझ्यावर प्रेम आहे रे कळत का नाही तुला ?'

असेच म्हणत असशील ना...माझ्या विरहात तू ही जळत असशील ना...

तुझ्यामुळे!

तुझ्यामुळे!

तुझे दर्शन झाल्यापासून,

मी निसर्गसॊंदर्य पहायचंच सोडून दिलय!

तुझ्या स्नेहात चिंब भिजल्यापासून,

पावसात हिंडणच सोडून दिलय!

तुझ्या नयनातील शराब प्यायल्यापासून,

मी 'पीणं' च सोडून दिलय!

आणि खरं सांगू?

तुझ्यावर मरायला लागल्यापासून,

मी जगणंच सोडून दिलय!

ती आवडली मला

ती आवडली मला,पण मी नाही विचारले तिला .....

Delete करेल friend लिस्ट मधून ती मला,

म्हणून नाही विचारले मी तिला,,,,


 

नाही बोलणार माझ्याशी म्हणून नाही विचारले मी तिला,,

चुकीच्या नाझरेने पाहिलं ती मला ,,,,,,,म्हणून नाही विचारले मी तिला,,,,


 

एक गैरसमज करून घेईल ती माझ्या बद्दलचा,,,म्हणून नाही विचारले मी तिला,,,

समोर कसा जाणार मी तिच्या,,,म्हणून नाही विचारले मी तिला,,,

भेटून सुद्धा नाही भेटणार ती मला,,,,म्हणून नाही विचारले मी तिला,,,


 

कोणाला सांगू हि शकणार नव्हतो ,,,, कि किती आवडते ती मला,,,,

कसा सांगणार मी तिला,,,,,,,किती आवडते ती मला??????

भीती वाटते त्या एका नाहीची ,,,,,,म्हणून नाही

विचारले मी तिला,,,

अजून किती "valentine days" निघून जातील,,,,पण नाही

विचारणार मी तिला,,,,,,,,,,


 

राहू दे मला या गोड अश्या गैरसमजुतीत,,,,,,,,,,,,,,

कि,,,,,,,,,'''मी आवडतो तिला'''''''

'''मी आवडतो तिला'''''''

खतरनाक हकीकत....!

खतरनाक हकीकत....!

जेव्हा लव्ह ब्रेक-अप होते तेव्हा.....

मुलगी (आपल्या प्रिय मैत्रिणीस )- तो पहा......नीच, बेशरम.. हलकट ...नालायक....:

.

.

.

.

.

.

.

.

.

.

मुलगा (आपल्या मित्रांना)- ती पहा .....माझी परी चाललीये....:D :D

(.- मुले हे मुलींच्या तुलनेत नेहमी सोज्ज्वळ आणि प्रामाणिक असतात

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य

ट्रक किंवा रिक्षाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते.


 

'मेरा भारत महान'

"बघतोस काय ? मुजरा कर .....! "

बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!

"बघ माझी आठवण येते का ?"

''पाहतेस काय प्रेमात पडशिल''

साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.

अं हं. घाई करायची नाही.

तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही

'तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'

'अहो, इकडे पण बघा ना...'

"हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".

थांब लक्षुमी कुंकू लावते!

तुमचे लक्ष आमच्याकडे का?

"लायनीत घे ना भौ"

चिटके तो फटके!

राजे तुम्हि पुन्हा जन्माला या

अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,फ्रिमॉन्ट्,हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

१३ १३ १३ सुरूर !

"नाद खुळा"

"सासरेबुवांची कृपा "

"आबा कावत्यात!"

पाहा पन प्रेमाणे

"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"

अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.

हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...

योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..

वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

हेही दिवस जातील

घर कब आओगे?

हॉर्न . ओके. प्लीज

"भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"

एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)

तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं

माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं

याचा विचार करून गाडी चालवा

एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल " आणि खाली लिहिले होते....

"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)

एका टेम्पोच्या मागे..

आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,

ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...

सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,

नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


 

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,

एकत्र घालवलेले क्षण आठवतील...

तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,

जगतानाही रोज असं मरावं लागेल...


 

कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,

प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..

डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,

कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...


 

कधीतरी असा एक दिवस येइल,

प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...

पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,

कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...


 

कधीतरी मग या मनालाही समजेल,

तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...

त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,

कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...


 

कधीतरी तू मला असं वचन देशील?

पूढच्या जन्मी तरी माझा होशील?

मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,

आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो यातच मग मला समाधान असेल..