Saturday, August 6, 2011

निशब्द तू, निशब्द मी


निशब्द तू, निशब्द मी
निशब्द या भावना.
मी शोधतोय तुला तळहातांच्या रेषांमधे...........
पण तुझा रस्ता तेथून जाईना.
मी मांडतोय मला शब्दांमधून.
अर्थ कळतोय तुला कवितांमधून.
तुझ्यासाठीच तर थांबलोय मी,
पण कोणीच वाट पहिना.
जशी सरिमगुन सर येते
तशी कधी कधी तुझी भेट होते.
मुक्तपणे बरसतेस तू ,
मग मात्र मला सोडून जातेस.
बोलण्यासारख खुप असत
तुझ ऐकन्यात खर सुख असत
मला जे सांगायचे ते.
तुला कस कळत नाही
निशब्द तू, निशब्द मी
निशब्द या भावना
मी पाहतोय तुला माझ्या स्वप्नांमधे.
आता तरी माझी हो ना.

एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,


एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला,
मनातल्या मनात आठवून गालातल्या गालात हसायला....
एक क्षण पुरे तुझा आवाज ऐकायला ,
कानातल्या कानात त्याची धून वाजायला....
एक क्षण पुरे तुझ्या डोळ्यांमध्ये पाहायला,
त्यांच्यातला प्रेम माझ्या डोळ्यांत साठवायला.... :D :D
एक क्षण पुरे तुझ्यावर भरभरून प्रेम कराय्ला,
तुझ्या प्रेमासाठी क्षण क्षण तरसायला......

तुझ्या भेटीची ओढ..............Tuzya Bhetichi Odh AAhe

तुझ्या भेटीची ओढ
प्रत्येक भेटी नंतर वाढतच जाते
मला फक्त एकाच सांग....
सांग न असे का होते
...तुझ्याशी बोलताना काळातच नाही
वेळ कसा निघून जातो
क्षण हा येथेच थांबवा
मनोमन हेच वाटत राहत
वेड मन माझं
त्याला समजू किती
तू येऊन गेलास तरीही
वात पाहत राही तुझीच
क्षणाचाही दुरावा
सांग का वाटतो युगासारखा?
कल्पनेतही आहे अश्यक्य
आता जगणे तुझ्या विना.....

जीवन. Jivan

रोज-रोज नवीन परीक्षा देण काही संपत नाही अन
जीवनच गणित मात्र काही केल्या सुटत नाही.
देता येईल जेवढे, तेवढे दु:ख देत गेले
नेता येईल संगे, तेवढे हसू घेऊन गेले
देण्या-घेण्याच्या व्यवहाराचा ताळमेळ काही बसत नाही
जीवनच गणित मात्र काही केल्या सुटत नाही.
अश्रू देणारयांची बेरीज दिवसेंदिवस वाढत गेली
प्रेमळ शब्दांची संख्या त्याहून दुपटीने घटत गेली
बेरीज-वजाबाकीची ही पद्धत काही बदलत नाही
जीवनच गणित मात्र काही केल्या सुटत नाही.
वर्ग करता अपेक्षांचा घनमूळ होई स्वप्नांचा
भागिले करण्या जाता, गुणाकाराच होई अश्रूंचा
उत्तरेही रोजच बदलती, स्थिर काही राहत नाही
जीवनच गणित मात्र काही केल्या सुटत नाही.