Saturday, May 28, 2011

मित्रा. Mitra


कधी कधी मित्रा तू माझ्याकडून दुखावला जात असतोस,
पण कसे समजावू तुला
,
असं करताना मला किती त्रास होत असतो

तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे,
मित्रा तू तर माझा जीव की प्राण आहेस

तुझ्यासाठी त्याग करायला मला काहीच वाटत नाही,
कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे

तुझ्याशिवाय जगणं ही कल्पनाच असह्य आहे,
तू म्हणशील तर आयुष्यावर पाणी सोडायला तयार आहे

आप्ल्या मैत्री आड कधीच काही नाही येणार,
पण
, प्रत्येक संकटाच्या वेळी तू विरू आणि मीच जय होणार

जाते म्हणतेस......... Jate Mhantes


जाते म्हणतेस...................

जाते म्हणतेस हरकत नाही
ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा

नाते तोडतेस हरकत नाही
मनी आज फक्त एकदा तरी राहून जा

भातुकली मोडतेस हरकत नाही
पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा

हसते आहेस हरकत नाही
माझी बुडती नाव पाहून जा

जाळत आहेस हरकत नाही
जळणारे माझे गाव पाहून जा

छळत आहेस हरकत नाही
माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................

तू तेव्हा तशी ... Tu Tevha Tashi


त्या रात्री स्वप्नांच्या राज्यातली एक नदी तिच्या डोळ्यात उतरली होती...
त्या रात्री वेगळेपणाची जाणीव पूर्णपणे सरली होती ...

उरले नव्हते कुठलेही पाश, न उरली कुठलीही आस ...
वाटले मिटून घ्यावे डोळे ... तू असता असे पास ...

भरून घ्यावा तुझा गंध ... जपून ठेवावा तुझा स्पर्श
असाच होत राहावा दोन मनाचा दोन देहाचा परामर्श ...

अचानक स्वप्न भंगले अन दिसली रिकामी उशी ...
तुझ्याही शेजारी असेल का ग ती तशी
?

नकळत माझ्या डोळ्याची कड पाणावली ...
असेल का ग तुझीही उशी अशीच ओली
?

विषय बदलावा म्हणून कूस बदलली ...
अन ह्या सगळ्यातच अजून एक रात तशीच सरली

तुला ते आठवते का सारे? Tula Te Athvte Ka Sare


तुला ते आठवते का सारे?
सर्द संध्याकाळी त्या
गुंफुनी हात फ़िरलेले
तुला ते आठवते का सारे
?
गर्द चांदण्या आकाशी
अन गहिरे ते उसासे
तुला ते आठवते का सारे
?
फुले उमलता प्रितीची
मन हळवे झालेले
तुला ते आठवते का सारे
?
पाठमोरा होऊन जाताना
पाश सारे तोडलेले
तुला ते आठवते का सारे
?
या देहाच्या धुरातून
अश्रु तुझे दाटलेले
तुला ते आठवले का सारे
?

नातं तुझं माझं Naat Tuza Ani Maza


नातं तुझं माझं
आठवणींच्या पलिकडलं
मनात वसलेलं
डॊळ्यात साठलेलं
हृदयात साठवलेलं

नातं तुझं माझं
पाण्यासारखं नितळ
गहिरं जस कातळं
खोल जस तळं
हिरव गार जस मळं

नुसत्या नावात न अडकणारं
नुसत्या रेषांमधे न सामावणारं
नुसत्या आभाळात न मावणारं
नुसत्या देहात न राहणारं

नातं तुझं माझं

मी गेल्यावर Mi Gelyavar


मी गेल्यावर स्मरशील का रे?
आठवणींनी व्याकूळ होउन
सांग कधी तू रड्शील का रे
?

या प्रश्नाला काय म्हणावे.
आत्म्याने देहास पुसावे
मी गेल्यावर जगशील का रे
?

आठवण माझी Athvan Mazi


आठवण माझी कधीतरी येईलच तुला

तु कदाचीत रडशीलही

हात तुझे जुळवुन ठेव तु

सगळी आसवं तुझी त्यात सामावतील

जो थांबला तुझ्या हातावर

नीट बघ त्याच्याकडे

एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल



माझ्या आठवणी एखदयाला

सांगताना तु कदाचीत हसशीलही

जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता

नीट वापर त्याला

अडखळलेला तो शब्द मीच असेल



कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला

त्याच्या तेजाला तु निखरत राहशील

मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं

नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल



कधी जर सुटला बेधुंद गार वारा

मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील

मध्येच स्पर्शली तुला

जर उबदार प्रेमळ झुळुक

नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल