Thursday, September 8, 2011

प्रेम

प्रेमातील नाजूक भावना
" मुलाचे डोळे हे गुगल पेक्षा जास्त वेगाने गर्दीतल्या सुंदर मुलीला शोधून काढतात ......
पण,
त्याच मुलाचे हृदय हे सरकारच्या कामकाजापेक्षाही संथ गतीने तिला प्रपोज करण्यास वेळ लावते "
 

प्रेम

सर्व सुख तुझ्या नावे करुन जाईन,
 हा प्राण तुला अर्पण करुन जाईन;
 तु रडशील माझी "आठवण" काढुन,
 इतके "प्रेम" मी तुझ्या हृदयात ठेवून जाईन

त्याच्या मिठीत विसावलेली ती

त्याच्या मिठीत विसावलेली ती
 अचानक
 त्याला
 म्हणाली-
 '' तूझं माझ्यावर जर खरचं प्रेम असेल तर सगळ्या जगाला सांगून दाखव...''
 . . .
 . . .
 . . .
 तिच्याकडे
 वळून तो
 हळूच तिच्या कानात बोलला-
 '' I love you..''
 . . . .
 . . . .
 ती म्हणाली-
 '' हे काय करतोयस..?''
 .
 .
 .
 .
 .
 तो तिला जवळ घेऊन म्हणाला-'' वेडे, तूच तर माझं जग आहेस...''