Wednesday, May 25, 2011

एकटेपणा टाकुन Ekte Pana Takun.


स्वत:चा शोध एकट्याला,
कधीच लागत नाही,
सावलीशिवाय ,
"
स्व" ची जाणिव कधीही होत नाही,

सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

विश्वासाला तडा गेल्यावर
काही मार्गच ऊरत नाही,
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते

नाती Nati


नाती
नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!!

काही अगदी जवळची,
तर
काही अशीच वरवरची...

नाती काही क्षणातच जुळणारी,
तर काही अनेक वर्षातही न
जाणवणारी...

काही नात्यांना देता येत नाही नाव,
तरीही ती असतात खूपच खास !

काही नाती ह्रुदयात घर करून रहणारी,
दूर राहूनही कधीच न
तुटणारी...

मात्र काही नाती तुटल्यानंतरही,
जन्मभर आठवत राहणारी ....

मुलींचे नखरे सांगा पाहु..... Mulinche Nakhre Sanaga Pahu


मुलींचे नखरे सांगा पाहु.....


मुलींचे नखरे सांगा
पाहु.....

मोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना.........
प्लीजजजजजज....)


2
किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून
जायचे की आपल्याला Call करायचा आहे.....आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी
करणार........

ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!

चल
चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा
आहेस

Movie!!!!!
नाही बाबा...घरी काय सांगु......

पहिले तु ईथुन
चल....ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे.....कोणि बघितल तर.......

मला जोशीचा
वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीम खुप
आवडते.
(
याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????)

चालून चालून खूप पाय दुख्ले
रे
(
म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी.. Ashi Maitrin Nashibane Labhavi


अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,

बोलली नाही
तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.

चालता चालताच पाठून तिनं हाक
मारावी,

घर जवळ येताच पुढे निघून जावी.

आपण नसलॊ की थोडीशी
हिरमूसावी,

दिसलो की गालवर छान खळी पडावी.

कधी हसता हसताच ती
रडावी,

कधी रडता रडताच खुद्कन हसावी.

हक्काने आपल्यावर
रागवावी,

मग कही न बोलताच निघून जावी.

नंतर चूक कळल्यावर नुसता
मिसकॉल द्यावी,

आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.

सकाळी
भेटल्यावर हीचकीचत बोलावी,

निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.

लेक्चर
ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,

वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी
अबसेन्ट असावी.

ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,

नाहीतर थोडीशी अबॊल
रहावी.

सुखात सगळ्यांना सामिल करावी,

व्यथा फक्त माझ्याकडेच
बोलावी.

बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,

आठवण काढताच तिला
मात्र उचकी लागावी.

परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,

"
साधा
एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.. Dolyat Ale Pani


अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी............ ......... ....


एकदा
डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना
रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या
प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा
ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप
विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार
आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही
खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच
महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक
आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध
ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले
बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली
कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले
पाणी.............

मैत्री कधी ठरवून होत नाही Maitri Kadhi Tharvun HOt nahi


मैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर
तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....
एकमेकांत येऊन रस्ते
मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळते
आणि
नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालु लागतो...
नंतर जवळ येतो
एकमेकाला
आधार देतो
एकमेकाला सोबत करतो
एकमेकाची दु:खे वाटुन घेतो
आणि
आनंदाचे क्षण साजरे करतो...
मैत्री अशी होते..!
काय जादु असते
मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते
आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री
भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...
कधी कधी वाटतं
समुद्राच्या
काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात
खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....
विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद
उघडावा
अन त्यात मोती सापडावा ....

मैत्री करण्यासाठी नसावं Maitri


मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा
लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी
शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री
करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक
काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू
निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी
भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ
मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा
ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर
कळला

दूर निघून जाण्यापूर्वी...... Dur Nighun Janya Poorvi


दूर निघून जाण्यापूर्वी
एवढं तरी कर
अंगणात माझ्या घेऊन ये
एखादी
तरी सर...
तुझ्या सरीनं पुन्हा एकदा
भरून जाऊदे अंगण
तुझ्या
पुरानं पुन्हा एकदा
वाहुन जाऊदे कुंपण
पसरून माझे हात पुन्हा
झेलीन
तुझ्या गारा
श्वासामध्ये भरून घेईन
सळाळणारा वारा
ओसरून जाता सर
तुझी
दूर निघून जाशील
ओल्याचिंब तुझ्या आठवणी
मागे ठेऊन जाशील
जेंव्हा
जेंव्हा आठवेल तुझी
दुरावलेली सर
आठवणींचा पाऊस येईल
भिजवून जाईल
घर ........

पाऊस पडून गेल्यावर.... Pasun Padun Gelyavar


पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबांना
सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या
झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनी आल्या
त्या डबक्यांतील पोरांचे
मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती

प्रवासात सगळेच अनोळखी असतात.. Pravas


प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण
त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

जीवनात सगळंच
मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला
वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव
जालायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे
संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात
आणी म्हणूनच माणसे उमलतात आणि
फुलतात

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत... Prem


चांदणे पांघरलेले
आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवनीने
दे

बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात
दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे

बेधुंद करणार्या
रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र
आठवनीने दे

उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत
जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे

मुठी एवढे ह्रुदय नाही मागत
तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे
आठवणीने
दे....