Wednesday, October 5, 2011

तिचा अचानक मेसेज आला...... Ticha Message Ala

त्यादिवशी रात्री तिचा अचानक मेसेज
आला.मला खुप बरे वाटले. मी विचार
केला कालचे भांडण ती विसरली असेल पण
माझ्या विचारांचा चक्काचूर झाला कारण
तो ब्रेकअपचा मेसेज होता. ते वाचल्यावर
 ... मी जास्त मनावर दडपण न घेता लगेच
 रिप्लाय केला: चालेल.
 तिला माझा रिप्लाय बघून हेच वाटलं
 असणार की मला काहीच फरक पडत
 नाही तिच्या जाण्याने. पण तिला काय
 माहित....माझी काय हालत झालेली,
 मनातून मी खुप खचलेलो.
 एवढा वेळात तिचा एकही रिप्लाय
 आला नाही, म्हणून
 मी झोपण्यच्या तयारीत होतो. तेवढ्यात
 पुन्हा एक मेसेज माझ्या इनबॉक्स मध्ये
 आला, लिहिले होते कीः
 "प्रेम हे
 एका धनुष्याच्या बाणासारखा आहे.
 तो बाण सरळ समोरील
 व्यक्तीच्या ह्रदयाचा वेध घेतो. हा बाण
 ह्रदयात घुसताना काहीच वाटत नाही,
 पण काढताना मात्र अतोनात
 यातना देऊन जातो."
 तिचा मेसेज वाचुन कळले की तिला खुप दुःख
 झाले आहे. पण
 तिला झालेल्या यातना मलाही झाल्याच
 होत्या. म्हणुन मी लगेच रिप्लाय केलाः
 "प्रत्येकाच्या जीवनातून प्रेमाचा बाण
 एकदाच धनुष्यातून
 सुटतो,माझ्याकडुनसुध्दा सुटला. पण
 तो निष्फळ ठरला. एकदा सुटलेला बाण
 कधी पुन्हा येतो का?"
 त्यानंतर तिचा कधी रिप्लाय
 आला नाही मी वाट पाहतोय आज
 हि

तिला रडावसं वाटावं..............Tila radavs Vatat.

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...
 ...
 छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
 भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
 बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
 तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
 ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ....
 नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं... —

काही आठवणी अशा असतात........... Kahi Athvani Asha Astat

परत कधी घडणार नसतात
 म्हणुन त्या आठवणी असतात...

 काही आठवणी अशा असतात
 कधी त्या विसरायच्या नसतात...

 साठवुन त्या ठेवायच्या असतात
 हरवत त्या कधीही नसतात...

 रब्राने त्या खोड़ता येत नाहीत
 कारन त्या हाताने लिहील्या नसतात हसत हसत....

 हसत रडत विसरता येत नाही
 कारन त्या रात्रीची स्वप्ने नसतात...

 आठवणी जीवनाचा शेवट असतात
 नव्या जीवनाची सुरुवात असतात...

 तरी हरवन्या साठी महत्वाच्या ठरतात
 जन्म भर रहातात हृदयाच्या एका कोप~यात...

 सोबत नसले कोणी तरी
 सुख दुखांच्या आठवनीच आपल्या सोबत रहातात...
 आयुष्यभर.......

कदाचीत प्रेम म्हणजे.......... Prem Mhanje...

कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी ती
 का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव

 कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे
 शब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोले
 ...
 कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिला
 आजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवला

 कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर
 ठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझर......

 पण आता कळतयं....
 प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे
 आपले विसरून दुसर्‍याच्या विश्वात रमंणे..........

प्रेम

एक एक क्षण जड झाला..
 पाउस या डोळ्यात तुझ्या साठी दाटला..
 इतका दूर गेलास तू कि
 आता येणे तुझे कठीण वाटे..
 माझा जीव उतावीळ जरी
 तुला काहीच का कुणास ठाऊक कल्पना नसे खरी..
 माझ्याशी बोलत नाहीस ..
 आला जरी स्वप्नात जरी..
 प्रेम कसे कुणाला कळत नाही..
 ते प्रेम जेव्हा नसते सोबत तेव्हा त्याची किंमत कळते खरी..

मी एकटाच तिची वाट पाहत असतो......... Tichi Vaat Pahat

हे आत्ता रोजच झाले आहे
 मी एकटाच तिची वाट पाहत असतो
 आत्ता येइल मग येइल
 हिची वाट पाहत बसतो....

 अजुन कशी आली नाही
 रोज याच वेळी येते
 मग आज काय झाले???
 आज मीच तर लेट नाही???

 का इतका वेळ लागत असेल???
 मनात भरपूर शंका येतायत...
 ह्रुदयाच्ये ठोके
 घड्यालाचे कात्याहून जलद पडतायत
 आज मात्र ठरवले आहे मी
 नाही भेटली जर आज ती.....

 तर दूसरी सोबत घरी जाणार आहे ....

 एवढ्यात....

 अरेच्या ती तर आली
 हां फक्त थोडा वेळ लेट झाली
 मनाला एक सुखद आनंद मिळाला
 पण...

 तितक्यात एक अन्नौंसमेंट झाली

 "प्लेटफोर्म क्रमांक दोनची लोकल कार्शेदाला जाणार आहे
 कृपया या लोकालने प्रवास करू नये..."

 म्हणजे ती "ती" नव्हती
 मन पुन्हा उदास झाले
 पुन्हा तिच्या वाटेशी
 डोळे लावून बसले

 हे आत्ता रोजच झाले आहे
 मी एकटाच तिची वाट पाहत असतो
 आत्ता येइल मग येइल
 हिची वाट पाहत बसतो....

शब्द मनात उतरले...........Shabd Manatle

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
 तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

 तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
 नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

 तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
 सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

 खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
 मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

 म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
 तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....

 तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
 एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

 कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
 बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....

 इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
 अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....

 नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
 रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

प्रेमातील नाजूक भावना..............Pramatil Najuk Bhavna

"जरा ऐक ना, काहीसांगायचे आहे तुला.......
तुला भेटताना.......
होणारी ह्रुदयाची धडधड ऐकवायची आहे मला,
तुला पाहताना.......
हळूच झुकणारी माझी नजर दाखवायची आहे तुला,
तुझ्या बरोबर चालताना...........
हां रस्ता कधी संपू नये हे सांगायचे आहे तुला,
तू सोबत असताना.......
सुर्याची किरणे देखील गार वाटतात हे सांगायचे आहे तुला,
तू नसताना...........
तुझाच चेहरा नजरेमधे असतो माझ्या हे सांगायचे आहे तुला,
तुज्या बरोबर बोलताना.........
 होणारी शब्दांची धडपड ऐकवायची आहे तुला,
 तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा........
हे सांगायचे आहे तुला,
 तुझ्या बद्दल माझ्या मनातल्या भावना सांगायच्या आहेत तुला.........प्रेमातील नाजूक भावना

प्रेम

छान होतास रे तू.....पण जमलं नाही मला
 कळत होतं रे तुझं प्रेम पण ... माझं चुकलं रे जरा,
 असा नको विचार करूस कि मी विसरलेय तुला,
 मनात खोल कुठेतरी आठवणीमध्ये साठवलंय तुला

 ... आठवते मलाही आपले ते स्वप्नांचे घर,
 तुझ्या खांद्यावरून पाहिलेली ती पावसाची सर,
 वेळोवेळी तू दिलेली...माझ्या हक्काची साथ,
 अनवाणी वाळूत चालताना माझा धरलेला हात.

 हातावर रंग ठेवून....उडाले पाखरू,
 पण तू असं जगणं नको सोडूस,
 स्वप्न बघ.....तू...नवीन
 तुटलाय आपल्या घराचा वासा,आता पुन्हा नको जोडूस

 भेटली ना मी कधी तर...
 पाहून मला रडू नको वेड्या,
 कसंबसं सावरलंय मी स्वतःला,
 आता पुन्हा बांधू नको बेड्या....

 आताही तुझी आसवं मला नाही बघवणार,
 तुझे भिजलेले डोळे मला नाही पहावणार.
 धावत येईन मी तुला सावरायला....
 स्वतःच्या प्रेमाला रडताना पाहून स्वतःला कसं आवरणार??

 व्हायचं असेल तर...सगळं होईल रे ठिक,
 पण वाट नको पाहूस...माझ्याशिवाय चालायला शिक.

आज असं वाटलं की,...............Ajj As vatal ki

आज असं वाटलं की,
 कुणी जिवनात माझ्या डोकाउन गेलं.
 आज असं वाटलं की,
 ...
 कुणी मनात माझ्या पाहून गेलं...
 माझे डोळे बदं होते त्यावेळी
 आणि श्वास जणू थांबला होता.
 मग असं वाटलं की,

 कुणी ह्दयाचे ठोके मोजून गेलं...
 आज असं वाटलं की,
 कुणी जणू केस माझे कुरवाळून गेलं.
 आज अस वाटलं की,
 कुणी जणू पदराने मला झाकून गेलं...

 मला आठवतंय उश्याकडे कागंद होती,
 आणि हातात पेन होता.
 आज असं वाटलं की मानेखाली
 मग उशी कुणी सरकवुन गेलं

 आज असं वाटलं की,
 कुणी जणू दु:ख माझं जाणून गेलं.
 आज असं वाटलं की,
 कुणी जणू डोळे माझे पुसून गेलं...!!!