Tuesday, November 27, 2012

ही अखेरची तुझी आठवण


ही अखेरची तुझी आठवण

ही अखेरची तुझी आठवण
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही ...
...

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं
माझ्या मनात बरसणार नाही .....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस
माझ्या मनाच्या अंगणात
रिमझिमणार् नाही ....!

तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर ...!

म्हणूनच , हे अखेरचे काही अश्रू ,
फक्त तुझ्यासाठी ...
पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली
तुझ्यासाठी जमणार नाहीत ...

आणि हे अखेरचे काही शब्द ,
फक्त तुझ्यासाठी ...

पण यापुढे माझ्या कविता
तुझ्या आठवणी मागणार् नाहीत ...

यापुढे कधीही माझ्या कविता
तुझ्यासाठी असणार् नाहीत ...

ही अखेरची तुझी आठवण ...
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार् नाही ...!

कुणी असे भेटावे...... Kuni ase bhetave.

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

ज्याला आपल्या मनातले
सर्व काही सांगावे,

सांगता सांगता आयुष्य
पूर्ण सरुन जावे,

आणि सर्तानाही आयुष्य
...

पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

ज्याला घेऊन सोबतीने
खूप खूप चालावे,

चालता चालता दूरवर
खूप खूप थकावे,

पण थकल्यावरही
आधारसाठी त्याच्याकडेच
पहावे........

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

दुख त्याचे आणि अश्रू
माझे असावेत,

सोबतीने त्याच्या
खूप खूप रडावे,

आणि अश्रूंच्या हुंदक्यात
सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

आनंद त्याचा आणि हसू
माझे असावे,

त्याच्यासाठी मी जगतच
राहावे, जगतच राहावे,

आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून
जावे.......

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

ज्याच्या सोबतितल्या
प्रत्येक क्षणाने सुखवावे,

उन्हात त्याने सावली तर
पावसात थेंब व्हावे,

आणि मायेच्या थेंबानी मी
चिंब भिजून जावे...........

एकदा तरी आयुष्यात
कुणी असे भेटावे,

सूर त्याचा आणि
शब्द माझे असाव........... ..!!!