Sunday, January 20, 2013

प्रेम



पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
 पडावेसे वाटते...
 कोण ग तो तुझा
 म्हटल्यावर झुकलेली नजर
 आणि गुलाबी झालेले गाल
 बघून

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
 पडावेसे वाटते....
 रोज निरोप घेताना
 पुन्हा कधी भेटशील
 म्हणताना
 पाणावलेले डोळे आणि
 कपकपनारा कंठ बघून

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
 पडावेसे वाटते....
 कारण नसताना तासभर
 फोनवर
 भांडायचा स्वतः राग
 करून फोनही ठेवायचं
 फोन ठेवल्यानंतर
 मिनिटात आलेला
 आय लव यु चा मँसेज बघून

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
 पडावेसे वाटते....
 नकळत स्पर्श झाल्यावर
 तिच्या हृदयाचा चुकणार
 ठोका
 आणि थरथरणारे ओठ बघून

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात
 पडावेसे वाटत....

प्रेम


माझे तुझ्यावरचे प्रेम हे एका कागदा सारखे आहे,
एक असा कागद ज्यावर तू तुझी भावनालिहू शकतेस , तुझा राग खरडू शकतेस ,तुझे आश्रू पुसण्यासाठी मला वापरू शकतेस , फक्त वापरून झाल्यावर मला फेकून देऊ नकोस, कारण मला सदैव तुझ्याबरोबर राहायचे आहे.
पण हो,
जर तुला खूप थंडी वाजून आली तर मात्र उब मिळविण्यासाठी तू मला जाळू शकतेस.....

प्रेम


प्रेम" हे प्रेमात पडल्यावरचं समजतं

प्रेयसी :- तू दुसर्या मुलीकडे बघतोस
तेव्हा तिच्यातप्रथम काय बघतोस ...??
प्रियकर :- कोणाचसुंदर हास्य, कोणाचा सुंदर
चेहरा, कोणाचे सुंदर डोळे ....
... प्रेयसी :- ( रुसून, फुगून, नाक मुरडून)सगळी मुले
सारखीच असतात !!
प्रियकर :- ( तिलाजवळ घेऊन) पण सुंदर हास्य,
सुंदर चेहरा, सुंदर डोळे, सुंदरमन आणि सुंदर हृदय
हे सगळ एकाच ठिकाणीफक्त आणिफक्त
तुझ्याकडेच मलादिसतं आणि दर वेळी मला हे
त्या मुलींकडे बघून जाणवत.....!!♥♥

प्रेम


 दोघे एकमेकांना खुप प्रेम
होते करत,..

येता जाता नयनांनी
भावनांना होते
जपत...

ती त्याला पाहुन गोड
हसताचं,..

तो ह्रदयावर हात ठेवून
होता म्हणत..

देवा हीला नेहमी असेचं
हसतमुख ठेव,

जो पर्यंत मी नाही मरत..

प्रेम

असेल का कुणी ???
मला स्वतःपेक्षा जास्त जीव
लावणारं,

ठेचं लागता मला पटकन
सावरणारं .....

मी रागात असता,
मला प्रेमाने समजून घेणारं .....

असेल का कुणी ???
माझ्या सोबत आयुष्यभर,
प्रेमाने चार पावलं चालणारं .....

मी सुखात आणि दु:खात असताना,
नेहमी मला हक्काची साथ देणारं .....

असेल का कोणी ???
माझ्या प्रेमळ जीवाला,
नेहमी जिवापाड
जपणारं .....

मरण माझ्या समोर असता,
जिवाची पर्वा न करता मला वाचवायला येणारं ......

असेल का कोणी ???
माझ्या सोबत आयुष्यभर जगणारं,

माझ्या सोबत मरणालाही पत्कारणारं .....

असेल का कोणी ??
असेल का कोणी ??

प्रेम


आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती सोबत कुणाची हवी असते.
पण,असे का घडते की जेव्हा ती व्यक्ती हवी
असते तेव्हा ती जवळ नसते?
असे म्हणतात की प्रेम शोधुन सापडतं
नसते,
प्रेम हे न कळत होऊन जाते.
मग तरी देखील प्रत्येक व्यक्ती प्रेमा
च्या शोधात का असते ?