Wednesday, July 6, 2011

ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!! ......... Te Oth Tevha Maze Nastil

ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!
जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
 तुला माझी आठवण होईल
 तुझ्याही डोळयांत तेव्हा माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
 आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील
 तुझ्याही नजरा तेव्हा माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने ब...घशील तेव्हा तुला मी दिसेन...
कारण त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील तुझ्याही नजरेत तेव्हा...
 माझ्यासाठी अश्रू दाटतील.... माझ्यासाठी रडणारे ते अश्रू तेव्हा तुझ्यावरच हसतील
 कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

एक Boyfriend हवा होता....... Ek Boyfriend Hava Hota

एक Boyfriend हवा होता.......
एक बॉयफ्रेंड हवा होता...
बाहेर खुप शांत असणारा...
...
पण माझ्याबरोबर असला की मात्र मनसोक्त बोलणारा....
एक बॉयफ्रेंड हवा होता....
स्वतःची काळजी नसणारा...
पण मला मात्र स्वतःच्या जीवाहुन जपणारा....
एक बॉयफ्रेंड हवा होता......
नेहमीच बिझी असणारा......
पण मला भेटायला मात्र कसाही वेळ काढणारा.......
एक बॉयफ्रेंड हवा होता......
स्वतःच्याच मस्तीत जगणारा.......
पण माझ्यासाठी मात्र चंद्र-तारे तोडणारा.......
एक बॉयफ्रेंड हवा होता.......
खूप कंजूस असणारा........
पण माझ्या शोपिंगचा खर्च मात्र स्वतःहून करणारा........
एक बॉयफ्रेंड हवा होता....
सांभाळून गाडी चालवणारा......
पण मी सोबत असली की मात्र वाऱ्याच्या वेगात पळवणारा.........

तिला कधी समजलंच नाही Tila kdhich Samzal Nahi

क्षण . . .?
तिला  कधी समजलंच  नाही
माझं  अवखळ  मन ..
ती  हसायची ...
म्हणायची ... Dialoge मारतो . .
...
असेलही माझ  बोलणं  कदाचित . .
Dialoge   सारखे वाटणारे    ..
पण  त्या  भावना ?
त्या निश्चित खरया होत्या.........
तिचा  आवाज 
मला  फार   आवडायचा  ...
ऐकताना   अंगावर  मोरपिसाचा भास व्हायचा  . . .
ती  मात्र  हसायची  ...
हि.. हा.. हा . .
मी  मात्र  माझं  मोरपीस  जपायचो . .
तिची  द्विधा  असेल  कदाचित ...
पण  मी  प्रत्येक  क्षण  साठवायचो . .
हृदयाच्या  खोल  कुपीत ..
मोरपिसासाहित . . .
ती  गडबडली  ...
जाणे का रुसली  ...
न बोलताच  अंतरली ...
मी मात्र  कोसळलो  . .
गहिवरलो... व्याकुललो..
मोरपिसाचा भासही  मग   ..
आठवतच  धडपडलो  ..
ती मात्र शांत  तशीच ..
स्थितप्रज्ञ ,अज्ञ जशी .. .
मी आहे अजूनही आशेत  ..
मोरपिसाच्या . .
तिला खरच का कळलं नाही  
माझं अवखळ  मन ..?
मी मात्र जपलेत अजून
ते मोरपिसी क्षण . . .

एक परी दिसली.............Ek Pari Disali

एकदा मला आकाशात एक परी दिसली
हसली बघून माझ्याकड़े
म्हणते कशी मला.....
माग काय हव ते
मी म्हणाले...
सुन्दर आयुष्य दे मला
जिथे असेल फ़क्त सुख
नसेल कोणतही दुःख
ती म्हणाली देते
पण परत तक्रार नाही करयाची....
अणि झाल ही तसच
सुख सुख अणि नुसत सुख
ना घरात जागा ना मनात...
सुख कुठेच मावेना
शेवटी अश्रु आले डोळ्यात
माझ रडू ऐकून
परी आली धावून
म्हणते कशी सुखात का रडतेस?
तिला काय सांगायाच तेच कलेना
सुखच दुखते आपल्याला तेच उमगेना..
तीला म्हणले तुझ सुख घे
थोडस का होईना मला दुःख दे
दुख शिवाय काय किमत सुखाची....
कडू अणि गोड दोन्ही चव चाखु देना आयुष्याची