Thursday, August 4, 2011

असं प्रेम करावं..... Prem

असं प्रेम करावं थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं,
गुपचुप फोन वर बोलावं,कोणाची नाज़र पडताच पटकन
"अगं" चा "अरे" करावं असं प्रेम करावं
जग पुढे चाललं असलं तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं, असं प्रेम करावं
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं, असं प्रेम करावं
वर वर तिच्या भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं, असं प्रेम करावं
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं,
पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं असं प्रेम करावं
विरह येतील, संकट ओढवतील, प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं, असं प्रेम करावं
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं........

आवडली आहे मला एक मुलगी..... Ek Mulagi

आवडली आहे मला एक मुलगी ...........
आज आल्या चार ओळी मनात ,
केल्या कोणातरी वर ,
आवडली आहे मला एक मुलगी ,
...ती हि इंटरनेट वर
आहे ती फार दूर ,
शेकडो मैला (miles) अंतरी ,
pan राहते ती इथेच ,
अगदी माझ्या हृदया सरी
माझ्याशी बोलायला तिला ,
मला थोडा मानवाव लागतं,
ती बोलते फार कमी ,
म्हणून जरा हसवावं लागतं
ओळख आमची नाही पूर्ण ,
आणि मैत्री फार नवी ,
मनात आहे एक ज्योती ,
मला हि मैत्रीण हवी ..

तिचा फोन आला.... Ticha Phone AAla

आठवणीच्या वादळामध्ये गुरफटलो असताना
डोळ्यातून अश्रू वाहत असतना.
अन तिचा फोन आला....................
उचलून कानाजवळ आवाज ऐकताना
बंद होवून जातो hello बोलताना.
अन तिचा फोन आला ..................
दुखवलेल्या मनाला कसेतरी सावरताना
अश्रू पुसत मग फोन लावताना.
अन तिचा फोन आला....................
चमकून जाते विज शब्द तिचे ऐकताना
कसं जगावे जिवन आयुष्यात ती नसताना.
अन तिचा फोन आला..................................
स्वताच्या लग्नाची बातमी सांगत होती
रडू नका एवढे सांगायला विसरली नव्हती.
अन तिचा फोन आला....................
प्रत्येक वर्षी त्यादिवशी वाटते फोन बंद करावा
भिती वाटते येणारा फोन तिचा तर नसावा.
अन तिचा फोन आला..................