Thursday, May 26, 2011

काय असते आठवण...? Athvan


काय असते आठवण...?

पाण्याचा ओलावा ...

की
अमृताचा गोडवा ...

अश्रूंचा धारा ...

की झोम्बनारा वारा ...

पावसाच्या थंड गारा ...

की हा आसमंतच सारा ... ჱჱܓܓ



When Someone Talk About Word "LOVE"
We think about A person we like..!!

आपल्याला कोणी आवडणं Prem


आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं
ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा
दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं
वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला
आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं
असतं....

मैत्रीचे तीन प्रकार असतात.... Maitri


मैत्रीचे तीन प्रकार असतात....
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं

मैत्रीचे तीन प्रकार असतात....
1.मित्र - ज्याच्याशी मत जुळतात्...
2.सखा - ज्याच्याशी आपण सुखदुःख् वाटतो
3.जिवलग - ज्याला आपली दुःख न सांगताच कळतात..
तुम्हाला कोण व्हायला आवडेल???........




 

एक मैत्रिण असावी.. Ek Ashi Maitrin Asavi


एक मैत्रिण असावी
आपल्याला पण एक मैत्रिण असावी!
समोर आलॊ की थोडीशी
हड्बडावी
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी
चालता चालताच पाठून तिनं
हाक मारावी
घर जवळ येताच पुढे निघून जावी
आपण नसलॊ की थोडीशी
हिरमूसावी
दिसलो की गालवर छान खळी पडावी
कधी हसता हसताच ती रडावी
कधी रडता
रडताच खुद्कन हसावी
हक्काने आपल्यावर रागवावी
मग कही न बोलताच निघून
जावी
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम
तो कट्‌ करावी
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी
मागावी
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी
वाढदीवसाच्या पार्टीला
मात्र नेहमी अबसेन्ट असावी
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी
नाहीतर थोडीशी
अबॊल रहावी
सुखात सगळ्यांना सामिल करावी
व्यथा फक्त माझ्याकडेच
बोलावी
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी
आठवण काढताच तिला मात्र उचकी
लागावी
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी
"साधा एक फोनही केला नाही!"
म्हणत रुसुन बसावी
थोडा वेळ मग ती शांत रहावी
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी
काय़ आणले?" म्हणुन विचारावी
ती बरोबर असली की आधार वाटावी
आपल्याला पण एक
मैत्रिण असावी

कधीतरी वाटत

गर्दित स्वतःला हरवाव
जे सगळे करतात ते कराव
स्व्तःपासून
लांब पलाव
कधीतरी वाटत

काळात पाठी जाव

थोड़े थांबून वलून बघाव

वाईट
केलेल निस्तराव
कधितर वाटत

परत मनापासून हसाव

मन हलक होईपर्यंत
रडाव
धेयासाठी परत तसच भांदाव
कधीतरी वाटत

जे जालय ते होऊ दयाव

जे
होतय ते होऊ दयाव

प्रतेक क्षणात एकवटून जाव

**मैत्री अशी असते **** Maitri Ashi Aste


**मैत्री अशी असते ****
रातोरात रडवणारी
आसवाणी भीजवणारी
हृदयात प्रेमाच
नव घर करणारी मैत्री

मैत्री आकाराने लहान
पण अर्थाने मात्र महान
असते

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात
कारण ती रक्ताच्या
नात्याइतकीच खरी असतात

मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण
मैत्रीत असते
भावनांची जान

मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी
मैत्री असावी
सावलीप्रमाणे शांत करणारी

कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार
डोळ्यात
अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच
बदलतात

मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल
मैत्रीत असतो मनमनाचा
समतोल

मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारी...........

आई हा एक शब्द.... AAi Ha Shabd


आई हा एक
शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य शब्दात उतरवणं आहे ते
अशक्य!!

तरी हा एक प्रयास आहे तिच्याच वाढदिवसाला छोटीशी एक भेट आहे ..

आई
म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळी
आई म्हणजे
वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.......
मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब
आहे
मी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहे
माझ्या आयुष्याची ती एक चित्रकार
आहे
अंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहे
कोणत्याही वादळात तग धरून राहीलेली
माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहे
जिच्यामुळे मी, माझी कविता आहे

मैत्री केली आहेस......... Mairi Keli Aaahes Manun


मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं' कधी जोडू
नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू
नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ
पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू
नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल
तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते... फक्त जरा समजून
घे
'
नातं' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..
दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस