पहिली मैत्रीण
अजून ही मला खर वाटत नाही
ती नाहीये हे मनास पटत नाही
आता काल-परवा पर्यंत ती होती
माझ्या अवती-भवती दरवळत
एखाद्या उमळत्या कळीप्रमाणे
मनात भिनलेली कळत-नकळत
ती होतीच तितकी सुंदर
कानात अजूनही आहेत तिचे बोल
तिची साथ म्हणजे जणू इंद्रधनू
प्रत्येक रंग त्याचा होता अनमोल
तिच हसण तिच असण
हे किती सुखद असायच
गोजिर्या गाली तिच्या
फूल पाखरू हसायच
तिचे श्वास हेच माझे आयुष्य
तिच्याविना मी कुठे जगत होतो
सुखाच्या सागरी निजाव तिने
हेच देवाकडे मागण मागत होतो
पण ती खरच एक कळी होती
कळीच आयुष्य ते केवढ
मूठभर पाणी हाती घेऊन
ती उघडल्यावर राहील तेवढ
चिमुकल्या हातांनी जन्म भराच्या
आठवणी देऊन गेली आहे
प्राण माझे ही घेऊन गेली
शरीर फक्त ठेऊन गेली आहे
Tuesday, July 19, 2011
एका तलावाच्या काठाव Eka Tlavachya Kathavar
एका तलावाच्या काठावर ..........
प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!!!
प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे बघ
.........त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू,
किती छान बदके आहेत बघ !!
प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण बघतो म्हणूनच
आत मधले प्रेम लवकर कळून येत नाही ..........
वास्तविक मी तुझ्यावर, " त्या...पांढर्या शुभ्र सुंदर बदकांसारखे नव्हे
तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"
प्रेयसी :- ते कसे ?
प्रियकर :- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात
ते तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे उडून जातात,.....
तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच मरते"

आई AAI
"सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता
समोर मांडते
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची
चिंता सुरु करते
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना
सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला
हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
खर्च जास्त करु नको
म्हणताना हळूच दहा रुपये टेकवते
ती आई
परतिची आतुरतेने
वाट बघत असते
ती आई
रात्री निजवतान कपाळावरुन हात
फ़िरवते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
जीची
प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी असते
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले
आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच!!!"
ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता
समोर मांडते
ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची
चिंता सुरु करते
ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना
सगळ आवडीचे करते
ती आई
पदराला
हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई
खर्च जास्त करु नको
म्हणताना हळूच दहा रुपये टेकवते
ती आई
परतिची आतुरतेने
वाट बघत असते
ती आई
रात्री निजवतान कपाळावरुन हात
फ़िरवते
ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई
जीची
प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी असते
ती आई
आणि जिच्याशिवाय आपले
आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच!!!"
Subscribe to:
Posts (Atom)