Tuesday, May 1, 2012

प्रेम आहे माझे तुझ्यावर

तु मला विसरलीस तरी हरकत नाही,

प्रेम आहे माझे तुझ्यावर जबरदस्ती नाही..

मला सोडून तु खुश आहेस ना आणखीण नको मला काही,

पण ?????

खरं सागतो तुला माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय अजुन कोणचं नाही..

तुझ्याचंसाठी झुरतं गं मी तुझ्याशिवाय करमतचं नाही,

कदाचित माझ्यासाठी तु बनलिचं नाही..

तुझ्याशिवाय जगणे झाले कठीण मन माझे ऐकतचं नाही,

तुझ्याशिवाय जगणे हे जगणेचं वाटत नाही..

तु खुशाल जा गं मला सोडून,

मी ही यापुढे तुझी आठवण काढणार नाही...!

एकचं क्षण हवाय. Ek Kshan Hava Aahe

एकचं क्षण हवाय

तुझ्याबरोबर बोलायला,


सुःख तुला द्यायला

दु:ख तुझे माझ्या वर ओडून घ्यायला..



एकचं क्षण हवाय

तुझ्यासमोर बसायला,



तुला डोळे भरून पाहायला

तुझे चित्र हृदयात कोरायला..



एकचं क्षण हवाय

तुझ्याबरोबर चालायला,


पुढील आयुष्याच्या शुभेच्छा द्यायला

अन् अखेरचा निरोप घ्यायला..



शेवटचा श्वास उरला आहे

तुझ्यापासून दूर व्हायला..


तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे

आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे
दु:खाला विसरून सुखाला आणणार आहे
आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे ...
मनापासून प्रेम फ़क्त मीच करत होतो तुला
जगता यावे यासाठी फ़क्त मीच मरत होतो
माझ्या प्रेमाची कदर तुला कधीच कळली नाहि कारण
तुझ्या हृदयाची जागा कधीच खाली झाली नाहि
पण मी आनंदी राहू शकतो हेच तुला दिसणार आहे
कारण आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे
तुला मी नको फ़क्त पैसा नी आराम हवा होता
तुला मी हेही दिले असते मला फ़क्त जरासा वेळ हवा होता
तुला हे सर्व मिळाले असेल पण मी नाहि मिळणार कार
ण प्रेम म्हणजे काय तुला कधीच नाही कळणार
मी किती मजेत आहे हे सर्व जग बघणार आहे कारण
आता तुझ्याशिवाय मी नक्की जगणार आहे, नक्की जगणार आहे