Sunday, January 1, 2012

आठवण तुझी .... Athvan Tuzi


 येईन किंवा न येईन परत तुझ्या भेठीला,
  आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजाच्या गाठीला,
  आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण तुझी येत राहील,
  अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल,
  पण त्याची काळजी तु करु नको कारण तोच अश्रु
  तुझी आठवण आल्याचं नकळत सांगुन जाईल......!!


 डोळ्यांनी सजवलेले तुझे स्वप्न
 आश्रुंच्या प्रवाहात वाहून गेले !


 तो: उठ गं ये वेडू.....
 बघ तरी बाहेर सकाळ झाली.
 ती: माहितीय रे मला...पण माझी झोप राहिली.
 शी बाबा....का हि सकाळ झाली?
 तो: सांगणार नव्हतो तुला.....
 पण आता सांगूनच टाकतो...
 एकदाचं माझं मन हलकं करून टाकतो....
 ऐक,
 "चंद्राचं सुख सूर्याला काही पहावलं नाही,
 तुला पाह्ल्याशिवाय त्या वेड्याला काही राहवलं नाही,
 तुझे झोपेतले सुंदर रूपच पहायचे होते त्याला,
 पण स्व:तच्या प्रकाशाचा विसर पडला होता त्याला....
 उतावळा तो बिचारा....त्याची हि घाई घाई झाली,
 ह्या सगळ्या फंदात हि सकाळ झाली...."
 ती : हो का ?
 तो : हो....
 पण मी त्या सूर्यापासून अजून काही तरी लपवले आहे.....
 "उगाच तो बिचारा आशा करतोय ....
 कारण त्याला हे माहीतच नाहीयेय...
 त्याचा प्रकाश जितका लक्ख आहे,
 माझा तुझ्यावर तितका नाही पण त्याहून जास्त हक्क आहे...
 (शब्द नव्हते तिच्याकडे......ती फक्त लाजली)

प्रेमच होत ना ग ते?... Premach Hota Na Te


 प्रेमच होत ना ग ते?
 उद्याचं कुणास ठाऊक काय होईल
 पण तुझा राग म्हणजे एक प्रेमाचाच भाग
 असंच मी प्रत्येक वेळेला गृहीत धरायचो
 आठवतोय तुला तो क्षण डोळ्याखालची पापणी
 तू हातात घेऊन हळूच फुंकर मारताना
 माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करताना
 चल गं असं नसतच मुली
 असं मी हळूच पुटपुटायचो
 मग तुझे गाल फुगायचे
 उगाच माझ्यावर रुसायचे
 मी कान पकडून माफी मागायचो
 त्यावर तू हलकसं हसायचीस
 हातात हात धरून स्वप्नं रंगवायचीस
 म्हणायचीस,
 आपण कधी वेगळे होऊच शकत नाहीरे
 आणि आज तू कुठेतरी दूरवर जाऊन बसलीस माझ्या नजरेआड
 मी मात्र एकटा थकलोय आता वाटपाहून तुझी या गजाआड
 तुझ्याविना माझ हे चार भिंतीतलं आयुष्य म्हणजे
 करावासच ना?
 आज तुला साधी माझी विचारपूस हि करावीशी वाटत
 नाही
 म्हणून मला एक प्रश्न पडलाय ज्याचं उत्तर फक्त तूच देऊ
 शकतेस
 प्रेमच होतं ना ग ते?
 सांगना, नक्की प्रेमच होतं ना ग ते?

तू हवीशी वाटतेस......... Ka tu Havishi Vatates.

 का अजूनही तू हवीशी वाटतेस
 का अजूनही तू हवीशी वाटतेस
  " एवढं " सारं झाल्या नंतरही .....

 तुझे हात पहिले की ,
 ... कधीकाळी झालेल्या स्पर्शांची आठवण होते
 तुझ्या अशा कितीतरी गोष्टींशी निगडीत
 अगणित गोष्टीं आठवत राहतात

 तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण
 शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचा तो राग
 आणि मग पुढे,मी लपवलेले
 सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू
 अन हसऱ्या खळीमागची कडवट दुःख ....

 वाटायचं की तुझेही डोळे भरून आले असतील
 कदाचित तुही गुडघ्यांत मान खाली घालून
 रात्रभर बसली असशील
 झोपेची वाट बघत,
 मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील..तुही. ..कदाचित....

 कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला
 माझ्यापासून ...माझ्या स्वभावापासून ....

 आता बरेच महिने लोटले
 आता बऱ्यापैकी पुसलं गेलय दुःख
 शेवटी काळ हे जालीम औषध असतं
 " असल्या " जखमांवर ...
 किंवा नसेलही कदाचित .....

 का अजूनही तू हवीशी वाटतेस
 " एवढं " सारं झाल्या नंतरही ..

तिला सांगता सांगता राहून गेले... Tila Sagta Sagta Rahun Gele


तिला सांगता सांगता राहून गेले,
जीव जडला तुज्यावरी, होकार मजला देशील का?
जोडीदाराची गरज भासते, सांग माजी तू होशील का?
गीत माजे तुज्यासाठी, शब्द त्यातले होशील का?
मन माझे तुज्या वरी, प्रिये तू मला ते देशील का?
फुलुनी माजे जीवन, गंध प्रिये तू होशील का?
मागणी घालतो तुला मी, राणी जीवनात माझ्या येशी का?

एक वेडी मैत्रीण..... Ek Vedi Maitrin


 एक वेडी मैत्रीण
 होती माझी................
 एक वेडी मैत्रीण होती माझी ,
 बोलायला लागली कि आपलंसं करून
 टाकणार ,
 तिचं मन म्हणजे नितळ पाण्याचा झरा ,
 स्वतःचा असा रंगच नाही त्याला ,
 जो रंग मिसळला त्याच रंगात न्हाऊन
 निघणारं ,
 नकळतपणे त्याच्याशीच एकरूप होणारं ,
 तिला एक दिवस विचारलं,
 यातले चांगले मित्र कोण कसं ग
 तुला ओळखता येतं,
 तर म्हणे ,
 हे रंग तर प्रवाहाबरोबर वाहून जातात ,
 त्यांना माझ्यापासून वेगळं करता येतं ,
 खरे मित्र तर ते आहेत, जे माझ्याच सारखे
 असतात ,
 माझ्यात एवढं मिसळून जातात कि ,
 त्यांना माझ्याहून वेगळं सांगता येणार
 नाही ,
 जसा पाण्याच्या दोन थेंबामधला फरकच
 करता येत नाही ......
का बोलावे तुझ्याशी ?
कुठे पर्वा आहे तुला माझ्या मनाची
 तुझ्या माझ्या विचारात तफावत कमालीची
 माझ्या साठी प्रेम म्हणजे मंदिराचा कळस
 ... ... तुझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त कोरा कागद

 रोजचेच वाद आणि रोजच्याच कुरबुरी
 कधी तरी थट्टा मस्करी नाही तर रोजच सॉरी
 रोजच एकमेकांचे मन दुखवायचे
 परत स्वतःच वाईट वाटून घ्यायचे


 रोज वचन द्यायचे साथ नाही सोडणार
 आणि दुसर्याच क्षणी सांगायचे तुझे माझे नाही पटणार
 या सगळ्या वादात मानसिक त्रास आणि दुरावा
 घरच्यांना काळजी आणि करियर ची बरबादी
 असले प्रेम काय कामाचे ज्याने भविष्य बिगडेन
 सगळ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरेन

 थोडा होईन त्रास आठवणी विसरायला
 पण हीच वेळ आहे ठाम उभे राहायला
 अजून खूप क्षितिजे आहेत पार करायला
 अजून खूप प्रेम मिळेल नाती टिकवायला
 

आता मागे वळून नको पाहू
 कोणाची चूक नको विचारू

 झाले गेले सगळे विसरून नवीन वाट घे चालायला
 समोर बघ लक्ष लक्ष दिवे असतील तुझ्या स्वागताला
 तू परत येशील का?
 तू दोन शब्द माझे
 आता तरी ऐक्शिल का?
 आणि विसरून सार काही..
 तोडून बंधन सारी..
 माज्या प्रेमात पुन्हा
 तू विरघळषील का?
 .
 .
 तू परत येशील का?

 तुझाच आहे मी अजूनही,
 असेन फक्त तुझाच नेहमी.
 तुही होतीस मझीच फक्त..
 पुन्हा माझीच होशील का?
 .
 .
 तू परत येशील का?

विसरु नकोस तू मला Visru Nakos Tu Mala


 विसरु नकोस तू मला


 इतकेच सांगणे आहे तुला

 विसरु नकोस तू मला


 नहीं जमल फुलायाला

 हरकत नाही

 कोमेजुन मात्र जावू नकोस

 माझ्या प्रीत फुला

 इतकेच सांगणे आहे तुला

 विसरु नकोस तू मला

 नाही जमणार परत कधी भेटायला

 नाही जमणार एकमेकांना पहायला

 हरकत नाही

 इतकेच सांगणे आहे तुला

 टालू नकोस तू मला

 शेवटचच आहे हे भेटण

 घडणारच आहे ह्रुदयाचे

 तीळ तीळ तुटण

 नियतीनेच ठरविले आहे

 आपल्याला असे लुटण
 इतकेच सांगणे आहे तुला

 जपुन ठेव आठवणीना

 नाही नियमितपणे त्यात

 रमता आले हरक़त नाही

 पण विसरु नकोस तू मला