Thursday, October 27, 2011

प्रेम म्हणजे काय असतं..........Prem Mhanje Kai asat.

प्रेम म्हणजे काय असतं.

 जे नदीला समुद्राशी असत
 चातकाला पावसाशी असतं,
 टापोर्‍या दव बिंदूला गवताच्या पात्याशि असत.
 ...
 प्रेम म्हणजे काय असतं.
 जे चंद्राला चांदन्यांशी असत,
 इंद्रधनुष्याला क्षीतिज्याशी असत,
 सळसळणार्‍या वार्याला गर्जणार्‍या ढगांशी असत.

 प्रेम म्हणजे काय असतं.
 जे फुलपाखराला फुलाशि असतं,
 काजव्याला घनदाट अंधाराशी असतं,
 गुणगुणनार्‍या पतंगाला मीनमिनत्या दिव्याशी असतं.

 प्रेम म्हणजे काय असतं.
 जस सुखाला दुःखाशी असतं,
 हसण्याला रडण्याशी असतं,
 रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं.

 प्रेम म्हणजे काय असतं.
 जे हळूवार जपायाच असतं,
 हृदयात साठवून ठेवायच असतं,
 कितीही दुःख झाल तरी हसत जगायाच असतं,

 प्रेम म्हणजे काय असतं.

 जे फक्त शेवटपर्यंत…
 तुझ्यात आणि माझ्यात असतं

मराठी मुलगी ..................Marathi Mulagi

ती मुलगी मराठी असते

 कॉलेजमधे अनेक सुंदर मुली असतात,
 पण जी गोड लाजते,
 ती मुलगी मराठी असते.

 कॉलेजमधे मुली जीन्स घालुन येतात,
 पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
 ती मुलगी मराठी असते.

 कॉलेजमधे अनेक मुली असतात
 पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
 ती मुलगी मराठी असते

 कॉलेजमधे अनेक मुली असतात
 स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
 ती मुलगी मराठी असते

 शॉपींगलाही अनेक मुली जातात
 खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
 ती मुलगी मराठी असते

 प्रेम सगळे करतात
 पण आयुष्यभर जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
 जी प्रेमाने साथ् देते
 ती मुलगी मराठी असते

मागून बघ जीव ही........Magun Bhag Jiv

मागून बघ जीव ही........

 मागून बघ जीव ही
 नाही मी म्हणणार नाही
 नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
 पुन्हा मी मिळणार नाही

 तुझा झालो तेव्हाच मी
 माझ्यासाठी सपलो होतो
 प्र त्येक क्षण तुझ्यासाठी
 तुझ्या बरोबरच जगलो आहे
 श्वसांच्या प्रत्येक स्पंदणात
 फक्त तुलाच तर जपले आहे
 श्वास ही नाही मी म्हणणार नाही
 नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
 पुन्हा मी मिळणार नाही

 तुझे मज़े काही असते
 कधी कळलेच नाही
 तुझ्या शिवाय जगायचे
 स्वप्न ही पडले नाही
 मागून घे स्वप्ने ही नाही
 मी म्हणणार नाही
 नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
 पुन्हा मी मिळणार नाही

 स्वर्ग सजवायचा तुज्यासाठी
 म्हणून सार करत होतो
 जमिनीवर उभे राहून
 आकाशालही पकडत होतो
 उगडून भाग मूठ ही
 नाही मी म्हणणार नाही
 नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
 पुन्हा मी मिळणार नाही

 ईतकेच सांगतो तुला ही
 माझ्या शिवाय जमणार नाही
 आणि तुझे ते तरफडणे
 मे सहन करणार नाही
 मागून हे अंत ही
 नाही मी म्हणणार नाही
 नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
 पुन्हा मी मिळणार नाही

Prem

सांगायचे होते तुला काही...
 राहूनच गेले.
 मनातले गुपित ओठांवर आणायचे ..
 राहूनच गेले.
 तू माझी लैला.. मी तुझा मजनू
 तू माझी राधा.. मी तुझा कृष्ण
 प्रेमाला काव्यात गुंफण्याचे
 राहूनच गेले.
 तुझ्या सहवासात असतांना,
 तुला एकटक न्याहाळतांना,
 तुझ्याच विचारांत स्वतःला विसरतांना,
 तुझ्या सोबत जगायचे..
 राहूनच गेले.
 तू रागावशील, सोडून जाशील,
 मैत्रीचा धागा तोडून जाशील.
 माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे..
 राहूनच गेले. ........................

पहिल प्रेम...........Pahil Prem

पहिल प्रेम कोणी
 कधीच विसरू शकत नाही
 कारण त्याच तर असतात
 त्याच्यासाठी सुखद आठवणी

 माणुस किती जरी
 आनंदी असला तरी
 कधीच विसरू शकत
 त्या जुन्या आठवणी
 कारण तीच असते
 त्याची कहाणी

 माणुस स्वत:तर
 तर कधीच बदलत नाही
 कारण त्याला बदलावे लागते
 जशी असेल परिस्तिथी
 परिस्थितीच खर तशी असते

 माणसाला त्या पुढे नमावेच लागते
 परिस्थितीनुसार माणसाला
 बदलावेच लागते...

एकतर्फे प्रेम ..... Kadhi Tari Ektarfi Prem Karun Bagha

कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा.....!
नाही केले काही आपल्या साठी त्याने ..........
तरी त्याच्या साठी काही तरी करुन बघा....!
त्याच्या साठी आपले जीवन काही नाही......पण त्याच्या साठी जगुन बघा....!
आपल्या शब्दाला किंमत नाही ....... पण त्याच्या शब्दाला किंमत द्यायला शिका......!
आपले अश्रु म्हणजे पानी ........ पण त्याच्या अश्रुना मोती म्हणायला शिका ....!
एक तर्फे का होई ना, पण जिवापाड प्रेम करून बघा ....!