Sunday, September 18, 2011

प्रेम

एक  मुलगी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बॉयफ्रेंड : घाबरू नको.. माझा हात पकड.
मुलगी: नाही तु माझा हात पकड.
............
 बॉयफ्रेंड (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे ?
मुलगी: जर मी तुझा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुझा हात सोडून देऊ शकते.
पण जर तु माझा हात पकडला, तर मला माहितीये कि काहीही झालं तरी तु माझा हात कधीच नाही सोडणार........

प्रेम

प्रेम हृदयातील एक भावना..
कुणाला कळलेली..
कुणाला कळून न कळलेली..
कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली..
तर कुणी आयुष्यभरलपवलेली...
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली.. .
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी..
फक्त एक भावना...
जग बदलणारी...
जग चालवणारी..

प्रेम

कुत्र्याचे पिल्लू कितीही
सुंदर असले तरी त्याचे
शेपूट वाकडेच असते ........

.
...
तसेच
.

.

.

प्रेम कितीही चांगले
असले तरीही लोकांच्या नजरेत ते

.

.

.
"लाफडेच" असते