Wednesday, June 1, 2011

एक मुलगी होती साधी

एक मुलगी होती साधी सरळ थोडीसी खट्याळ ....नेहमी स्वप्नानाच्या दुनियेत
रंगलेली....आणि एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये
गुंतलेला....अशीच दोघांची एकदा ओळख झाली.....आणि त्यांची छान मैत्री
झाली....त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले....ती मुलगी रोज त्या
मुलाला फोन आणि sms करायची....जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms नाही
केला तर तो तिच्यावर रागवायचा.तिला विचारायचा " का ग काल तू फोन नाही केला
मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची ".ती त्याला त्याला म्हणायची कि " नाही
sorry काल नाही जमल फोन करायला ".तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी
नसायचा... त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा...रोज त्यांचे फोन आणि sms चालू
राहिले...त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे...तिने किती हि ठरवलं कि आपण
त्याला जास्त sms नाही करायचं...तरी हि त्याला sms केल्याशिवाय तिला करमत
नसे..ती त्याला sms करायची...... त्याचं बोलन वाढू लागल होत....ती एकटी
असली कि त्याचाच विचारात गुंतायची...किती हि ठरवलं कि नाही त्याचा विचार
करायचा तर हि .... ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत जात होती....कारण ती
त्याच्या प्रेमात पडली आहे हे तीच तिलाच कळल नाही............त्याच्या
विचारात असताना त्याचे बोलण आठवून स्वतःशीच एकटी हसायची....गाण गुणगुणत
बसायची.

" पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले "

आता
तिला त्याची सवय झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं... आणि तिला
त्याच्यशी बोलल्याशिवाय राहवत नसे....त्याच्या आवाजात ती आनंदी
व्हायची....हळू हळू ती त्याच पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कस आहे
?.. का आहे ? ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते..तो तिला
विचारायचा..." अग तुला कस कळल कि माझ मूड खराब आहे ते...?.ती त्याला
म्हणायची " मैत्री केली आहे.... थोड फार तरी कळू शकत "..अशाने ती त्याच्यात
आणखी गुंतू लागली...त्याच्याशिवाय तिच्या मनात कोणी नसे..

...तिला
त्याच्याबद्दल सगळ माहित आहे होत.... तो कसा आहे ? त्याचा स्वभाव कसा आहे ?
त्याच दिनक्रमच तिला माहित झाल होत..तो कधी जेवतो.... घरी किती वेळ
असतो... मित्रान बरोबर किती वेळ असतो...कधी झोपतो कधी उठतो..तिला हि वाटत
होत कि तो तिच्यावर प्रेम करत आहे..... पण तस काही नव्हते.

असच
एकदा तिने त्याला फोन केला....दोघांच्या पण गप्पा छान रंगल्या होत्या
..आता तिला त्याच्या मनातल जाणून घ्यायचं होत....पण काही केल्या तिला ते
जमत नव्हते...मग त्यानेच तिला विचारले " तू लग्न कधी करतेस ?".त्यावर ती
चटकन त्याला म्हणाली..." छे ! एवढ्यात लवकर नाही अजून वेळ आहे बघू "....मग
तीने त्याला विचारलं " तू कधी करतोस लग्न"..तो तीला म्हणाला " मी लग्न
करणार नाही. मी एकटाच बरा आहे..".ती खूप दुखी होते... काही क्षण तिला काहीच
सुचत नाही..हा असा का बोलत आहे..पण स्वतःला सावरून ... ती परत त्याला
विचारते... " तू असा का बोलत आहे .... तुझ्या आयुष्यात काही घडल आहे
का?"..तो अपसेट होऊन तिला म्हणतो " होय , आणि आता मला कोणीच नको मी एकटाच
बरा आहे खूप सुखी आहे ".त्याच्या आयुष्यात खूप काही घडल आहे असे तिला वाटू
लागल..मग ते दोघे तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू लागतात ... आणि ती
त्याच कोमजलेला चेहरा फुलवते...

" सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!

रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?"

तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत... तो नकळत तिला बोलून जातो. "तू खूप चांगली आहेस... तुझ चांगलच होईल..."

पण ती मनातल्या मनात म्हणत असे..... माझे चांगले होईल पण जेव्हा तू माझ्या सोबत असशील"

करण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती ........आता तिला तीच प्रेम व्यक्त करण जमत नव्हते...

अजून हि ते दोघे तसेच रोज बोलत आहे....रोज फोन आणि sms चालू आहे....

त्याला कळत नव्हते ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करत आहे एका निष्पाप मनाने

तिला अशा आहे कि आज न उद्या त्याला तीच प्रेम कळेल..आणि ती त्याला सगळ सांगेल.....

पण अजून हि तो मुलगा तिला काही बोलला नाही.... ती वाट पाहत आहे त्याची.....

आणि स्वतःला प्रश्न करत बसले आहे ...

" प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा

लपसी कोठे गोपाळा, गोविंदा...

तिला मिळेल का त्याच प्रेम..................?

आपल्या भावना ती व्यक्त करू शकेल का त्याला....?

का अशीच वाट पाहत बसेल त्याची ....?

कधीतरी अशीच

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...

सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...

तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...

कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...

कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...

पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...

कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...

त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...

कधीतरी तू मला असं वचन देशील?
पूढच्या जन्मी तरी माझा होशील?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो यातच मग मला समाधान असेल.

ट्रेन सुटली ..धावता धावताच तो चढला

ट्रेन सुटली ..धावता धावताच तो चढला .. धावत पळत.. कसा बसा गर्दीतून तो आत
शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या दरवाज्या जवळतो
पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात असावी.. बराच
वेळ..त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन पाहिलं.. त्याच्या
नजरेत..एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती.. त्याने
गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या दरवाज्याजवळ येऊन परत खात्री केली.. रुमाल
काढून घाम पुसला..लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला मोबाईल फोन
बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून..लगेच फोन केला.. नुसताच हेलो हेलो
ऐकू आलं ..तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने पुन्हा प्रयत्न केला.. पण
मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा निर्णय घेतला..! पण..शांत
राहून सुद्धा..तो इकडे तिकडे पाहत होता..कि ती कुठे बसली तर नाहीये ना..!


खर
तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर त्याने तिची वाट
पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये चढणे..त्याचे तिला पाहणे.. रोजचा एकत्र ट्रेन
मधला प्रवास..! गर्दीतून... त्याने तिला दिलेलं स्मितहास्य..अन
त्यावर..तिने ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच ..प्रेम वाढत गेलं..
प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले.. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा प्रवास
सुद्धा एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं .. पण नियतीला ते मान्य नव्हतं..घडू
नये तसचं घडलं..

एके दिवशी अचानक....ट्रेन मध्ये आरडा ओरडा....
बायकांच्या किंकाळ्या.. माणसांची गडबड.. ट्रेन थांबवण्यासाठीची लोकांची
धडपड.. सारे वातावरण भयानक.. "कोणी चैन खेचा चैन खेचा..मुलगी पडली " अश्या
हाका. ट्रेन मधले लोकं उठून बाहेर पाहायला लागले.. ट्रेन थांबली.. पण ...
ट्रेन थांबण्या आधीच ..सार संपलं होतं... तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना..
पाय घसरून पडली होती.. तिचे शरीर ट्रेन आणि प्लाटफोर्म मधल्या अंतरात अडकलं
होतं.. काही समजण्याच्या आधीच.. तीच आयुष्य संपलं होतं.. त्याच्या नजरे
समोर ती त्याला कायमची सोडून गेली होती.. सार निःश्ब्ध.. हृदयाचे ठोके
चुकले...या परिस्थितीत काय करावं..त्याला काहीच कळत नव्हतं.. जमलेल्या
लोकांनी आणि पोलिसांनी.. राहिलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतली..पण त्याचं
मन आतून पूर्णपणे ढासाळून गेलं होतंनुसतं स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत
राहिला …. मगाशीच आल्या आल्या तिने मारलेल्या गप्पा.. त्यांनी एकत्र
घालवलेले सारे क्षण आठवायला लागले... आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून
गेल्यावर त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाट
धरली होती... आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं.. ह्याचा अनुभव फार जवळून
त्याला जाणवला.. त्याच जागी तो ..एकटाच रडत बसला. .


आज पण तो रोज
तिची वाट पाहतो.. तिकडेच.. त्याचं जागी.. १०:१५ ची CST पकडतो.. लोकल मध्ये
चढल्यावर...असाच काहीसा तिला तो रोज शोधत राहतो..अन...नंतर परत.. सार आठवून . भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत शांत बसतो..


आयुष्य हे
क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे आपली काळजी करणारे बरेच लोकं
असतात.. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय घडू शकत याचा विचार करा..
घाई.. ऑफीस... सगळ्यांच्याच नशिबी असतं..पण जीवन हे अमूल्य असतं.. ह्याचा
विचार करा..अन आजपासून..जपून प्रवास करा..

पुन्हा प्रेम करणार नाही….

पुन्हा प्रेम करणार नाही….
पुन्हा प्रेम करणार नाही.....
भेट आपली शेवट्ची असुन
निरोप घेत आहे
वरुन शांत असले तरी
ह्र्दयात रडत आहे
जात आहे सोडुन मला
नाही अडवणार मी तुला
असशील तिथे सुखात रहा
याच शुभेच्छा तुला
निरोप तुला देताना
अश्रु माझे वाहतील….
काऴजाच्या तुकड्याना

सोबत वाहुन नेतील
त्या वाहणारय़ा अश्रुतही

प्रतिबिंब तुझेच असेल
निट निरखुन पहा त्याला
प्राण मात्र त्यात दिसेल
वाट आपली दुभंगली आता
परत भेटणे नाही
प्रवास जरी एक आपला
मार्ग एक होणे नाही
आठवण तु ठॆवु नकोस
मी कधीच विसरणार नाही
भेटणे तुझे अशक्य तरी

वाट पाहणे सोड्णार नाही
जातेस पण जाताना एवदे सांगुण जाशील का?
भेट्लो जर कधी आपण
ओळख तरी देशील का?
जाता जाता थोडे तरी
मागे वळुण पाहाशील का?
प्रत्यशात नाही तरी
डॊळ्य़ानी बोलशील का?
बोलली नाही तु जरी
नजर तुझी बोलेल का?
गोधंळलेल्या अत:करणाची
खबर मला सांगेल का?
कुठॆतरी ह्र्दयात इतिहास सारा आठवशील

तो आठवण्यापुरता तरी तु
नक्कीच माझी राहशील

नजरेने जरी ओळखलेस तु
शब्दानीं मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात
नसती वादळ असणार नाही
नेहमीच पराभव झाला तरी….
हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही….

माझ्या या नजरेची भाषा

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना, काय चाललाय हा खेळ मन जुळता
जुळेना, माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे, तू होणार नाहीस माझी
या वेड्या मनाला कुणी सांगावे, तू आहेस माझी स्वप्न परी, नाही भाळलो फक्त
तुझ्या रुपावरी, फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी, मी मात्र तसाच राहील
वाऱ्यावरी, येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी, ढाल हास्याची करूनी मन जळतय
आतुनी, फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी, तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला
आहे जपुनी , माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना, काय चाललाय हा खेळ
मन जुळता जुळेना, माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे, तू होणार
नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!

क नात...

क नात...
एक नात...
कितीही ठरवलं तरी,
तुझ्यावर रूसून राहता येत नाही.
उघड्या डोळ्यांनी तुला टाळलं तरी,
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्यायच उरत नाही...

डोळ्यातून अश्रू ओघळला,
की तोही आपला राहत नाही.
वाईट याचंच वाटतं की,
दुःख त्याच्या सोबत वाहत नाही...

"'प्रेम' .....


 


 

"'प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा, नुसता ऐकला तरी हर्ष होतो, आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो"

पहिला पाऊस पडतो तेंव्हा

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्‍या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्‍यापाशी
तळं होऊन साचायचं!

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!

म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं

तुझी कविता म्हणजे

तुझी कविता म्हणजे यमक जुळवणं
अन् माझी म्हणजे मनं जुळवणं...
तुझी कविता म्हणजे मीटर बांधणं
अन् माझी मनाचं मुक्त धावणं....
तुझी कविता म्हणजे अर्थ लपवणं
अन् माझी मनाचं दार उघडणं...
तुझी कविता म्हणजे कल्पनेत रमणं
अन् माझी म्हणजे केवळ जगणं.....