Sunday, October 2, 2011

सागं आठवण आली की काय करायचे ?...... Athvan Ali Ki kay karayche

सागं आठवण आली की काय
 करायचे ?
 नाते तुझे हळुवार जपायचे ,
 आठवण आली की अलगद उमलायचे ,
 नको करूस अट्टाहास , सांग कधी भेटायचे ,
 दरवेळी मात्र मीच वीचारायचे , तु फक्त
 हो म्हणायचे ,
 सागं आठवण आली की काय करायचे ?
 मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे ,
 या वेडयामनाला कोन समजावयाचे ?
 सागं आठवण आली की काय करायचे ?
 तुझ्या जवळ बसले असता मनं
 कधी गप्पा मारायचे ...
 मनातले हे बोल सांग कधी कळायचे ?
 सागं आठवण आली की काय करायचे ,
 नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे ,
 सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच
 करायचे ,
 येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे ,
 सागं आठवण आली की काय करायचे ?
 फोन मात्र मीच करायचं ,
 H.....R... U मात्र तू बोलायचे ,
 तु दिसला की डोळे भरुण पहायचे ,
 ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे ,
 सागं आठवण आली की काय करायचे ?

एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या.... Bhar mala dolyat tuzya

एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या
आणि घे डोळे मिटुन
बघ कळतयं का तुला की,
तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन

भावनांना किँमत

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत कधी ङोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती,शब्दांचा आधार घेऊन जर दूखः व्यक्त करताआले असते तर कदाचीत कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती. आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किँमत कधी उरलीच नसती :)

प्रेम

प्रेम हृदयातील एक भावना..
 कुणाला कळलेली..
 कुणाला कळून न कळलेली..
 कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली..
 तर कुणी आयुष्यभरलपवलेली...
 ... कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली..
 तर कुणाची गंमत झालेली..
 कुणाचे आयुष्य उभारणारी..
 तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी..
 फक्त एक भावना.

खरं प्रेम...Khar Prem

खरं प्रेम
 एके दिवशी, फुरंगटुन, ती म्हणाली,
 ‘माझ्यावर खरं प्रेमच नाहीय तुझं‘
 तो म्हणाला, ‘ अग वेडे,
 प्रेम एक असतं तरी किंवा नसतं तरी.
 त्यांत खरं, खोटं, अस काही नसतं.‘
 डोळे बारीक करून, त्याच्याकडे रोखून पहात,
 तीने विचारले, ‘ते सोड, आधी सांग बघू मला,
 परवा गेलो होतो आपण सिनेमाला,
 त्यावेळी मी नेसलेली साडी,
 कोणत्या रंगाची होती?’
 डोके खाजवून बराच वेळ, तो म्हणाला,
 ‘हरलो.खरंच, नाही बुवा आठवत.
 पण एका प्रसंगांत,
 तुला अनावर रडू कोसळलं,
 तेंव्हा मी माझा रूमाल
 दिला काढून, तुला डोळे पुसायला.
 तो घेताना, अगदी हळूवारपणे,
 तू माझा हात दाबलास
 आणि एकीकडे रडता रडता,
 तू छानशी हसलीस.
 तेवढं मात्र नक्की आठवतय मला....

प्रेमाचा वर्षाव........ Premacha Varshav

"कुणी तुमच्यावर दगडांचा वर्षाव केला तर तुम्ही त्याच्यावर
 प्रेमाचा वर्षाव करा ,पण कुणी तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तर
 थोडावेळ थांबून नीट विचार करा, कारण दगडा पेक्षा प्रेमाच्या
 वेदना फार होतात ज्याच्या खुणा आयुष्यभर मनावर राहतात ".

मैत्रीण माझी.........Maitrin Mazi

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
 वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी

 हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख
 मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख

 आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी
 मनातील वादळांना मनातच थोपवणारी

 भासते कधी आकाशातील चांदणीसारखी
 तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी

 तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर
 तरीही अंतःरात रुतलेली खोलवर

 तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे
 हरलो जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे

आपण लग्न कधी करायचे? ................... Lagna Kadhi karayche

मुलगी:- आपण लग्न कधी करायचे?

 मुलगा:- घरी विचारूनसांगतो.

 मुलगी:- तुझे माझ्यावर जास्त प्रेम आहे कि घरच्यांवर?

 मुलगा:- घरच्यांवर

 मुलगी:- का?

 मुलगा:- मी जेव्हा लहान होतो तेव्हा, चालताना पडलो कि आई उचलयाची, बाहेर
 जायचो तेव्हा पप्पा बोट पकडायचे, रडायला लागलो तर ताई आणि दादा त्यांची
 खेळणी द्यायचे. कळले का

 मुलगी:- पण घरातून बाहेर पडल्यावर त्यांच्या कडे न जाता माझ्याकडेच येतो ना रे माकडा.
ज्यांच्या साठी डोळ्यात
 पाणी यावे अशी माणसे
 आयुष्यात खूप
 कमी भेटतात....!!!!
 .
 ... ... .
 .
 .
 .
 .
 .
 आणि ती जेंव्हा भेटतात
 तेंव्हा डोळ्यात पाणी येऊ नये
 याचीच जास्त
 काळजी घेतात...!!! :)

प्रेम

तो पर्यंत कोणावर प्रेम करू नका...
 जो पर्यंत तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही..
 आणि जेव्हा प्रेमकरणारा कोणी भेटेल..
 तेव्हा येवढ प्रेम करा कि,
 तो दुसरया कोणावर प्रेम करणार नाही...