Sunday, October 2, 2011

खरं प्रेम...Khar Prem

खरं प्रेम
 एके दिवशी, फुरंगटुन, ती म्हणाली,
 ‘माझ्यावर खरं प्रेमच नाहीय तुझं‘
 तो म्हणाला, ‘ अग वेडे,
 प्रेम एक असतं तरी किंवा नसतं तरी.
 त्यांत खरं, खोटं, अस काही नसतं.‘
 डोळे बारीक करून, त्याच्याकडे रोखून पहात,
 तीने विचारले, ‘ते सोड, आधी सांग बघू मला,
 परवा गेलो होतो आपण सिनेमाला,
 त्यावेळी मी नेसलेली साडी,
 कोणत्या रंगाची होती?’
 डोके खाजवून बराच वेळ, तो म्हणाला,
 ‘हरलो.खरंच, नाही बुवा आठवत.
 पण एका प्रसंगांत,
 तुला अनावर रडू कोसळलं,
 तेंव्हा मी माझा रूमाल
 दिला काढून, तुला डोळे पुसायला.
 तो घेताना, अगदी हळूवारपणे,
 तू माझा हात दाबलास
 आणि एकीकडे रडता रडता,
 तू छानशी हसलीस.
 तेवढं मात्र नक्की आठवतय मला....

No comments:

Post a Comment