जन्माला आला आहेस
थोडं जगून बघ..
जीवनात दुःख खूप आहे.
थोडं सोसून बघ..!!
चिमुटभर दुःखाने कोसळू नकोस,
दुःखाचे पहाड चढून बघ..
यशाची चव चाखून बघ,
अपयश येतं, निरखून बघ..!!
डाव मांडणं सोपं असतं,
थोडं खेळून बघ..
घरट बांधणं सोपं असतं,
थोडी मेहनत करून बघ..!!
जगणं कठीण तर मरण सोपं असतं
दोघांच्या वेदना झेलून बघ..
जीणं-मरणं एक कोडं असतं ,
जाता-जाता एवढं सोडवून बघ...!!!