Sunday, August 28, 2011

एक अश्रू..

एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,
एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..
एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..
पुन्हा पुन्हा..
तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..
एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..
एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..
एक जीव..
तडफडणारा..
असहाय्य..
तुझ्याविना..
तुझ्याचसाठी....

सांगायचे होते तुला काही... Sangaychi Hote Tula Kahi

सांगायचे होते तुला काही...
राहूनच गेले.
मनातले गुपित ओठांवर आणायचे ..
राहूनच गेले.
तुझ्या सहवासात असतांना,
...तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.
तू रागावशील, सोडून जाशील,
मैत्रीचा धागा तोडून जाशील.
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे..
राहूनच गेले...

प्रेम कराव.... Prem Krave

प्रेम कराव....
कारण प्रेम हे अश्रू देत..
ओठांवर हसू पण देत...
आनंद देतो ...तर
आनंद हिरावून हि घेतो...
प्रेम हे अनुभव देतो..
जीवन जगण्याचे....
आयुष्य घालवण्याचे....
नवा पाठ शिकवतो....
अन त्याचे प्रश्न पण देतो....
त्याचे उत्तर हि ह्यातूनच मिळते....
प्रेम हे पुढे जायला शिकवतो...
हरून जिंकायला शिकवतो....
प्रेम कराव....
कारण माणूस तेव्हा माणसात राहतो...
माणुसकीला धरून माणुसकीन वागतो....
प्रेम कराव....माणसावर....
प्रेम कराव....जगण्यावर...
प्रेम कराव...स्वतःवर....
अन प्रेम कराव ....स्वतःच्या अस्तित्वावर....
कारण ...
प्रेम सांगतो....विश्वासान जगन....
ततस्त होऊन मरण....
जिंकून कधी कधी गमावण....
गमावून सर्व मिळवण...
म्हणून प्रेम कराव....
आयुष्यात एकदा का होई न प्रेम कराव......

प्रेम म्हणजे प्रेम असतं, Prem Mhanje Prem Asat

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा
तरीसुद्धा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !
सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !
आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !
बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !
कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !
प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात
कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं
खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी
तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं