Sunday, January 22, 2012

एक मैत्रिण आहे माझी... Ek Maitrin Aahe Mazi.

एक मैत्रिण आहे माझी...
 नेहमी सलवार-कमीज़
 ... घालणारी
 साधेपणातच सौंदर्य आहे....
 हे सिद्ध करणारी,
 ... ... एक मैत्रिण आहे माझी...
 ... हिशोबिपणे वागणारी,
 तिच्या या सवयीमुळे.....
 माझे पैसे वाचवणारी,
 एक मैत्रिण आहे माझी...
 कठोरतेने वागणारी,
 जरा ओरडलो की मात्र.....
 मुसू मुसू रडणारी,
 एक मैत्रिण आहे माझी...
 माझ्यावर
 सारखी चिडणारी,
 न कळत मात्र.... माझ
 आयुष्य फुलवणारी,
 एक मैत्रिण आहे माझी...
 सर्वाना हवीहवीशी वाटणारी,
 माझ्याशिवाय मात्र....
 स्वतःला अपूर्ण
 मानणारी.........

वाटते ना असावे कुणीतरी

वाटते ना असावे कुणीतरी
 बावळटासारखे वागणारे
 वेड्यासारखा वागेल पण
 तेवढेच वेड्यासारखे प्रेम करणारे
 वाटते ना असावे कुणीतरी
 ... कितीही कामात असले तरी
 एक क्षण आठवण काढणारे
 जीव देणारे असतील
 पण आपला जीव जपणारे
 वाटते ना असावे कुणीतरी

प्रेम म्हणजे .........Prem Mhanje

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
 म्हणजेच प्रेम नसते
 रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
 म्हणजेच प्रेम नसते
 तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे
 ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
 कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..त्यांचे मन किती हि दुखावलेत...
 तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
 ते केवळ "तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...."
 हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
 हेच खरे प्रेम आहे.........
 हाच खरा विश्वास आहे ...आणि हेच जीवन आहे...
 

असे हे प्रेम .... Ase He Prem.

न सांगता कळणारे, अन कळून हि न सांगता येणारे...
 असे हे प्रेम असते...
 डोळ्यात नेहमी दिसणारे,पण वाचता न येणारे...
 असे हे प्रेम असते...
 काळजीतून कळणारे,पण कळूनही न वळणारे...
 ... असे हे प्रेम असते...
 कधी कधी बोलून हि न मिळणारे,अन कधी कधी न बोलतास आपलेसे करणारे...
 असे हे प्रेम असते...
 जीवाला जीव लावणारे,अन कधी कधी जीवासाठी जीव हि देणारे..
 असे हे प्रेम असते...
 असे हे प्रेम असते

प्रेम

ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ....
 तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून
 बोल.. मी तर भांडणार...
 ती: किती नालायक आहेस... काय मिळतं
 तुला माझ्याशी भांडून...
 तो: हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही ऐकलयेस का... "कोई हसीना जब रूठ
 जाती है तो और भी हसीन हो जाती है"...
 ती: हो ऐकलय...
 तो: पण तसं काहीही नाहीये ;)....
 ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५
 चापटा मारत)... जा बाबा.. जा ... तो: अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक... मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर
 जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी... मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून
 सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी... मी तुझ्याशी भांडतो... "आजपासून बिलकुल
 बोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य
 म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज
 ऐकण्यासाठी... मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग
 असतांना देखील एका अनामिक ओढीने
 माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी... अन मी तुझ्याशी भांडतो...
 भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत
 घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय
 'क्षणांसाठी'....