Thursday, June 9, 2011

तुम्ही प्रेमात असतात ....

तुम्ही प्रेमात असतात ....
जेव्हा मध्यरात्रीच्या ठोक्याला तुमच्या हृदयाचा ठोका न चुकवता
ती चा फोन येतो, आणि तुम्ही थोड्या वेळा पूर्वीच तिला आठवलेल असत

तुम्ही प्रेमात असतात

जेव्हा तिचे एसएमएस वारंवर वाचत असतात

तुम्ही प्रेमात असतात

जेव्हा भरधाव गर्दीत ही तुम्ही शांत गतीने पुढे सरकत असतात

तुम्ही प्रेमात असतात

जेव्हा गरज नसतांनाही तिच्या समोर लाजतात

तुम्ही प्रेमात असतात

जेव्हा ती चा विचार येताच हरदयाचे ठोके वाढतात

तुम्ही प्रेमात असतात

जेव्हा कुठल्याही गोष्टीवर तुम्ही दोनदा ह्सतात

तुम्ही प्रेमात असतात

जेव्हा सगळे अवती भवती असतनांही तुमचे नेत्र तिलाच बघतात

तुम्ही प्रेमात असतात

जेव्हा ही कविता वाचतनाही तोच असतो तुमच्या "मनात".......

सौंदर्य पाहून कधीच प्रेम होत नाही

सौंदर्य पाहून कधीच प्रेम होत नाही ,
कारण ते आज आहे उद्या नसेल ,
त्यासाठी एकमेकांवर विश्वास हवा ,
कारण तोच आयुष्यभर सोबतीला असेल ... :)

पाऊस पडत असताना..

पाऊस पडत असताना..

भिजतात सर्व पाऊलवाटा...

भेटीसाठी तुझ्या होतो वेडा..

जशा किनाऱ्यासाठी सागरी-लाटा...

आज पुन्हा एकदा

आज पुन्हा एकदा तो काळा ढग चिडला,

उद्विघ्न होवून तो ढसा-ढसा रडला .

आज तो इतका रडला, इतका रडला,

कि सागरच त्याच्या फुढे फिका पडला

ती मैत्री।


 


 

कमळपत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं

नीसटणार्‍या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं

माणसाच आयुष्य हे असच असतं

बाकी काहीही हरवलं तरी, त्यापेक्षाही जास्त उरलेल असतं.


 

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात


 

बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात

काही मात्र आपोआप जपली जातात,

कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात.


 

मोहाच्या नीसटत्या क्षणी परावृत्त करते ती मैत्री,

जीवनातल्या कडूगोड क्षणांना निशब्द करते ती मैत्री,

जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला साथ देते ती मैत्री,

आणि जी फक्‍त आपली असते, ती मैत्री।

ओसरून जाता सर तुझी

ओसरून जाता सर तुझी

दूर निघून जाशील

ओल्याचिंब तुझ्या आठवणी

मागे ठेऊन जाशील

जेंव्हा जेंव्हा आठवेल तुझी

......दुरावलेली सर

आठवणींचा पाऊस येईल

भिजवून जाईल घर

बरं वाटलं तू आलीस !

बरं वाटलं तू आलीस !

आज भेटलीस !!


 

रात्री माझ्या बागेत ,

रातराणी फ़ुलली होती

...कारण नसताना, उगाचचं

ती बडबड करत बसली होती !

तेव्हाच यायला हवं होतं लक्षात,

आज तू भेटणार ,

इतके दिवस कुठे होतास म्हणून

भांड भांड भांडणार

भांडून भांडून दमल्यावर ,

माझाचं हात हातात धरून,

पुन्हा माझ्याचं खांद्यावर डोकं टेकणार

hmmmmmmmmm

*मी अन एक friend (मुलगी) chatting करत होतो..

मी: hmm ...(कारण मला बोर झालेलं)

ती:hmmmm ...(माझ बघून....मुद्दाम)

मी:hmmmmmm ....

ती:hmmmmmmmmm........

मी:hmmmmmmmmm....

ती:hmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm,,,,,

मी:एवढा मोठा "hmmm"....मुलगी म्हणाव कि म्हैस.*

बघ माझी आठवण येते का????

मुसळधार पाऊस......

ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...

बघ माझी आठवण येते का..

हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.

इवलासा मेल वाचून बघ...

बघ माझी आठवण येते का????


 

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.

डोळे मिटुन घे.तल्लीन हो.

नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.

इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.

मग वाचू लाग.

माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.

वाचत राहा मेल संपेपर्यंत.

तो संपनार नाहीच.

शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.

फ़ॉरवर्ड करु नकोस.

पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.

आता दुसऱ्या मेलची वाट बघ.

बघ माझी आठवण येते का???.


 

घड्याळात पाच वाजतील.

तुला निघायची घाई असेल.

तितक्यात एक मेल येईल.

तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.

तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण.

तु म्हण सर्व्हर डाऊन होता.

मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.

तो पुन्हा फॉरवर्ड करेल.

तू तो डीलीट कर.

एखादी कविता वाच.

बघ माझी आठवण येते का???


 

मग निघायची वेळ होईल.

तरी पुन्हा मेल येईल.

तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,

मग तुही तसेच लिही.

मेल मागून मेल येतील.

फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.

शेवटी सगळे डीलीट कर.

आता रिकाम्या इनबॉक्स कडे बघ.

बघ माझी आठवण येते का..????


 

यानंतर लॉग आऊट व्हायला विसरु नकोस.

या नंतर पिसी बंद करण्याचा प्रयत्न कर.

या नंतर...ऑफिस मधुन बाहेर ये.

घरी लवकर जाण्याचा प्रयत्न कर.

येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी.... मेल करताना...

बघ माझी आठवण येते का??

का हे मन वागत वेड्यासारख

का हे मन वागत वेड्यासारख

कस समजावू त्याला समजत नाही ....

येवून गेली असलीस ऑनलाईन तरी

सारखी तुझीच वाट पाहत राही ....


 

ऑनलाईन असून बोलली नाहीस तरी

मन,तुझच प्रोफाईल नुसत पाहत राहत ....

बोल्त शब्दांचे अडसर हवेत कशाला ?

अन तुझ प्रतिबिंब डोळ्यात साठवत बसत ..


 

तुझ्याशी बोलतानाहि काही कळत नाही

वेळ चटकन कसा निघून जातो ....

प्रत्येक क्षण हा इथेच थांबावा

मनोमन असच सारख वाटून राहत ....


 

तुला भेटण्याची ओढ प्रत्येक चाट नंतर

का ग सारखी वाढतच जाते ?

मला फक्त तू हे एकच सांग

माझ्याबरोबरच का ग असे होते ?


 

दुरावा देखील हा क्षणा क्षणाचा

सांग का वाटतोय असा युगानसारखा ?

तुzयशिवाय ग मी मनजे

सुगंधाविन फुलासारखा , सुगंधाविन फुलासारखा