Thursday, June 9, 2011

ती मैत्री।


 


 

कमळपत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं

नीसटणार्‍या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं

माणसाच आयुष्य हे असच असतं

बाकी काहीही हरवलं तरी, त्यापेक्षाही जास्त उरलेल असतं.


 

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात


 

बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात

काही मात्र आपोआप जपली जातात,

कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात.


 

मोहाच्या नीसटत्या क्षणी परावृत्त करते ती मैत्री,

जीवनातल्या कडूगोड क्षणांना निशब्द करते ती मैत्री,

जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला साथ देते ती मैत्री,

आणि जी फक्‍त आपली असते, ती मैत्री।

No comments:

Post a Comment