Sunday, April 1, 2012

फुलपाखरांकडून रंगीबेरंगी छटा तुझ्यात येऊ दे,
माळरानावरच्या फुलांचा सुगंध तुझ्यात असू दे.!!

मधुर फळांची रसाळता तुझ्यात न्हाऊ दे,
शांत हिरव्या पानांचा ताल तुझ्यात चढू दे.!!

अश्रूंना त्या गालावर कधीच स्थान नसू दे

वाञ्याचा झंजावात तुझ्या नसानसात भिनू दे,
दिव्याची प्रखर ज्योत तुझ्या मनात तळपू दे.!!

पौर्णिमेच्या चंद्राचे सौंदर्य तुला मिळू दे,
अमावस्येची रात्र मात्र माझ्या वाटेला येऊ दे.!!

आयुष्यातले प्रत्येक सुख तुला अनुभवता येऊ दे,
दुःख मात्र तुझ्या वाट्याचे मला मनात दडवू दे.!!

आनंदाची खळी नेहमीच तुझ्या गालात खिळू दे,
अश्रूंना त्या गालावर कधीच स्थान नसू दे.!!
काही मिळविण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते,
बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते
अश्रु बनतात शब्द आणि शब्द बनतात कविता,
खरच कुणाच्या आठवणी सोबत जगण्याची मजाच वेगळी असते.

आज मी खुप खुश आहे,

आज मी खुप खुश आहे,

कारण ?????

आज मी तीला कायमचा विसरण्यात
... यशस्वी झालो..

आज मी तीची दिवसात फक्त दोनदाचं
आठवण काढली,

एक म्हणजे श्वास घेताना आणि दुसरी
म्हणजे श्वास सोङताना..
---
नाती हि रक्ताचीच नाही: तर
नाती जाणीवांनी जुळली जातात
जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही
आपली होऊन जाते .........आणि
जर जाणीव नसेल तर आपली माणसे हि
परकी होऊन जातात...

विसरू शकत नाही..

खूप विसरण्याचा प्रयत्न करतो पण विसरू शकत नाही..

तिच्याशी कितीही बोललो तरीही मन भरत नाही.

का येत असते तिची नेहमी आठवण..

कारण कदाचित माझ्या मनात करून ठेवलीये तिची साठवण.

पुन्हा गेला आजचा दिवस तसाच भांडणात आणि रुसण्यात.

पण खर सांगतो प्रेमात वेगळीच मज्जा असते रुसून बसण्यात.

अजूनही पाहतोय तीच्या एका SMS ची वाट.

जशी रोज वाहून नेते मला ती स्वप्नांची लाट.

इतकच सांगायचय तिला कि जरा अजून काही क्षण पहा माझी वाट.

नक्कीच येयील तो क्षण..आणि त्यात आपण दोघांना वाहून नेणारी प्रेमाची लाट.

तू आहेस मनातल्या मनात

मनात माझ्या तुझीच आठवण
मनात माझ्या तुझीच वाट
मनातच आहे सगळं काही
मनात माझ्या तुझे विचार दाट

... सामावून मी ठेवलंय सगळंच
ह्रिदयाच्या आतल्या आत
कसं सांगू ग सजनी
तू आहेस मनातल्या मनात

शांत तुझा स्वभाव
निरागस तुझे डोळे
स्वप्नं सुंदरी तू माझी
पण विचार तुझे भोळे

पहावी सजून तुला
माझ्या घराच्या अंगणात
कसं सांगू ग सजनी
तू आहेस मनातल्या मनात

दुरावा.


आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर,
दुरावा वाढतो,अंतर वाढते.
यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते.
चूक वेळेची असते.
यावर एकाच उपाय आहे.

त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या कि,
तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील.
जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात,त्यांना असे गमवू नका.
आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते

I miss YOu

जगायला शिकवलेस तू..





हे बघ काय केलस तू....
कुणालातरी जगायला शिकवलेस तू
कुणालातरी हसायला शिकवलेस तू
कुणालातरी प्रेम करायला शिकवलेस तू
कुणालातरी रडायलाही शिकवलेस तू
... माझा विचार न करता मला सोडून गेलीस तू
पण
हे बघ काय करून गेलीस तू
कुणालातरी जगायचा अर्थ शिकवून गेलीस तू
अश्रुंची किंमत समजावून गेलीस तू
नात्यांची किंमत काय असते ते समजावून गेलीस तू
विरहाचा अनुभव देऊन गेलीस तू
एक शहान्याला वेडा करून गेलीस तू
आणि एक वेड्याला कवी करून गेलीस तू ..