खूप विसरण्याचा प्रयत्न करतो पण विसरू शकत नाही..
तिच्याशी कितीही बोललो तरीही मन भरत नाही.
का येत असते तिची नेहमी आठवण..
कारण कदाचित माझ्या मनात करून ठेवलीये तिची साठवण.
पुन्हा गेला आजचा दिवस तसाच भांडणात आणि रुसण्यात.
पण खर सांगतो प्रेमात वेगळीच मज्जा असते रुसून बसण्यात.
अजूनही पाहतोय तीच्या एका SMS ची वाट.
जशी रोज वाहून नेते मला ती स्वप्नांची लाट.
इतकच सांगायचय तिला कि जरा अजून काही क्षण पहा माझी वाट.
नक्कीच येयील तो क्षण..आणि त्यात आपण दोघांना वाहून नेणारी प्रेमाची लाट.
No comments:
Post a Comment