Wednesday, August 24, 2011

प्रेम काय असते...........

पाण्यातुन काढलेल्या माशाला
विचारा पाणी काय असते
विरह सोसलेल्याला विचारा
प्रेम काय असते................
नभी नक्षत्र असती बहु थोर
पण एकच लुभावते चंद्रकोर
अशी चंद्रकोर ज्याने नित्य मनात जपली
त्याला विचारा
प्रेम काय असते..................
सागर लाटा जाणति
कधि न होईल आपली धरति
तरि एका क्षणिक मिलनासाठी
किनाऱ्यावर धावति
अशा लाटांचे जो जीवन जगला
त्याला विचारा
प्रेम काय असते...........
भुतलावर कित्येक सरोवरे गोड
पण चातकास मृग धारांचीच ओढ
असा चातक बनुन जो रहिला
त्याला विचारा
प्रेम काय असते..............
आणि शेवटी
जो तिच्या साठीच जगला
क्षण क्षण झुरला
सोडुन ती गेली
तरी वाट बघत राहिला
त्याla  विचारा
प्रेम काय असते...........

खूप दिवसांनी ती मला भेटली Ti Mala Bhetali

खूप दिवसांनी ती मला भेटली
काही न विचारता अगदी मुदयावर आली
तिच्या शब्दांनी तन सुन्न झाले
ते ऐकून डोळे अगदी भरून आले
"विसरून जा मला" अस ती म्हणाली
पुन्हा न भेटण्याची ताकीद तिने मला दिली
काही न बोलता मी खाली मान टाकून उभा होतो
डोळ्यात येणार्‍या त्या थेंबांना मी अडवत होतो
ती निघून गेली
तिच्या पलटण्याची वाट पहिली
ती परत येईल, ती मला समजून घेईल
पण ती वाट फक्त एक आसच राहिली
तिच्या सुखाताच माझ सुख बघितल
तिच्या दु:खातच माझ दु:ख पाहील
अस कधी ती करेल वाटल नव्हत
कारण तिच माझयावर खूप प्रेम होत
माहीत नाही काय कारण आहे
ती मझयशी दूर जात आहे
कधी तरी तु माझया भावना समजशील
मझयासाठी कधी तू परत येशील?

चॉकलेट पेक्षा गोड Chocklet Peksha God

ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....
नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
मनातल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......
सांग न माला..........खरंच का कधीतरी माझी होशील.....
ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......
फक्त एकदाच मन घटट करून.......सांगशील का गं माझ्या कानात.......
वाट पाहिन तुझ्या उत्तराची........खात्री आहे मला तुझा होकार असेल.......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
आज भेटली ती मला......न मागताच चॉकलेट दिला मी तिला.....
हसत हसत म्हणाली का रे असा वागतोस........
मीच तुझ्याकडे मागते रोज.....तू का नाही माझ्याकडे चॉकलेट मागतोस......
नाही कळत मला चॉकलेटची गोडी......तुझ्यावीना कशी व्ह्ल्लवू संसाराची होडी......
जेंव्हा तुझ्या मनात माझ्या होडीत बसण्याची.......ओढ़ असेल......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
रागाऊ नकोस माझ्यावर कधी...........तुझ्या बरोबर फिरायला.......
तू सांगशील तिथे येत जाईंन....मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......
कधी देशील तुझा होकार मला......याची मी वाट पाहत राहीन.....
तुझ्या तोंडून कधी कडू शब्द येणार नाही म्हणुन मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......
काय होईल पुढे, केंव्हा कधी कसे....याचीच वाट मी पाहत राहीन.......
मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन......

प्रेमाची सुरुवात आकर्षणापासून पासून होते

प्रेमाची सुरुवात आकर्षणापासून पासून होते
कुणासाठी या आकर्षणाचे कारण...."समोरच्याचा चेहरा" हे असतं.
"LOVE AT FIRST SIGHT " म्हणतात ना तसे खरे काही नसते.
ते आकर्षण असते,समोरच्याचा चेहरा तुम्हाला आवडतो आणि मग तुम्ही त्या चेहऱ्या मागे धावू लागता.
हळू हळू ओळख होते,समोरच्याच्या आवडी निवडी कळतात,विचार कळतात,
...स्वभाव कळतो.
कधी कधी तर "समोरच्याचा चेहरा" काहीच matter करत नाही.
समोरची व्यक्ती तुमच्यासमोर कोणत्या तरी क्षणी असा काही निर्णय घेते किंवा असे काही तरी वेगळे करते,
कि
त्या "एकाच क्षणात" तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडता.
त्या एका क्षणाला तुम्ही कितीही म्हटले तरी तुम्ही तुमच्या मनाला रोकु शकत नाही.
प्रेम व्हायला तो "एकच क्षण" पुरेसा असतो.
दोघेही प्रेमात पडतात.दोघेही एकमेकांत गुंतत गुंतत जातात.
आकर्षणाचे रुपांतर "प्रेमात" होते.
पण सगळे तेव्हा बिघडते तेव्हा
जेव्हा,
समोरचा जीव खूप गुंतल्या वर त्यातल्या एकाला जाणीव होते कि त्याचे हे प्रेम......प्रेम नसून आकर्षण होते.
पण त्यातला एक जीव त्या नात्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो.
हात सोडून जातो.
आणि
समोरची गुंतलेली व्यक्ती मात्र तिथेच उभी राहते......रिकामे हात घेऊन......स्तब्ध......भरलेले डोळे घेऊन