Wednesday, August 24, 2011

प्रेमाची सुरुवात आकर्षणापासून पासून होते

प्रेमाची सुरुवात आकर्षणापासून पासून होते
कुणासाठी या आकर्षणाचे कारण...."समोरच्याचा चेहरा" हे असतं.
"LOVE AT FIRST SIGHT " म्हणतात ना तसे खरे काही नसते.
ते आकर्षण असते,समोरच्याचा चेहरा तुम्हाला आवडतो आणि मग तुम्ही त्या चेहऱ्या मागे धावू लागता.
हळू हळू ओळख होते,समोरच्याच्या आवडी निवडी कळतात,विचार कळतात,
...स्वभाव कळतो.
कधी कधी तर "समोरच्याचा चेहरा" काहीच matter करत नाही.
समोरची व्यक्ती तुमच्यासमोर कोणत्या तरी क्षणी असा काही निर्णय घेते किंवा असे काही तरी वेगळे करते,
कि
त्या "एकाच क्षणात" तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडता.
त्या एका क्षणाला तुम्ही कितीही म्हटले तरी तुम्ही तुमच्या मनाला रोकु शकत नाही.
प्रेम व्हायला तो "एकच क्षण" पुरेसा असतो.
दोघेही प्रेमात पडतात.दोघेही एकमेकांत गुंतत गुंतत जातात.
आकर्षणाचे रुपांतर "प्रेमात" होते.
पण सगळे तेव्हा बिघडते तेव्हा
जेव्हा,
समोरचा जीव खूप गुंतल्या वर त्यातल्या एकाला जाणीव होते कि त्याचे हे प्रेम......प्रेम नसून आकर्षण होते.
पण त्यातला एक जीव त्या नात्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो.
हात सोडून जातो.
आणि
समोरची गुंतलेली व्यक्ती मात्र तिथेच उभी राहते......रिकामे हात घेऊन......स्तब्ध......भरलेले डोळे घेऊन

No comments:

Post a Comment