Sunday, December 11, 2011

प्रेम......... Prem

पाउलवाट ह्या नेतील कुठे,
 ठाऊक नाही ग मला...
 पडलो मधीच कुठेतरी,
 तर हात देशील न या हाताला...
 दुख्यातून ह्या चालताना,
 चकलो जर आपण,
 तर आवाज देशील न ग मला...
 अन,
 परत भेटल्यावर,
 हळूच जवळ घेशील न ग मला..
 एक वाचन दे तू,
 चालता चालता या वाटेवर,
 आयुष्याभर सात देशील,
 अन,
 आज करतेस तेवढंच प्रेम,
 पुढे हि करशील न ग मला...
 आज करतेस तेवढंच प्रेम,
 पुढे हि करशील न ग मला...

कुठे गेले ते दिवस .. Kuthe Gele Te Diwas

कुठे गेले ते दिवस ..
जेव्हा मी तुला भेटत होतो ..
तु जरी उशिराने आलीस ..
तरी तुला मात्र समजूण घेत होतो ..
एकदा मला भेटलीस की ..
बोलण तुझ संपत नव्हत ..
रडतानाही हसण तुझ्या ..
गालावर विरघळत होत ..
लाजण तुझ कमी नव्हत ..
पण गालावरच्या खळीमागे ..
ते ही हळूच दडून बसत होत ..
राग तर तुझ्या ..
नाकावरच्या शेङयावर होता ..
कितीही उपाय केले तरीही
तो काही कमी होत नव्हता ..
रागात तर तु फार ..
सुंदर दिसत होतीस ..
म्हणुन तर मला तु ..
तुझ्या रागासकट हवी होतीस....

तिच्या प्रेमात पडतांना... Tichay Premat Padtana

तिच्या प्रेमात पडतांना
 तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
 तोंड दुखेपर्यंत बडबडलो
 पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं .
 तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
 तिच्या नजरेला नजर भिडवतांना
 तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं .
 तिच्या हाताचा, ओठणीचा,
 स्पर्श हवाहवासा वाटतो
 सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
 हा विषय काढायचं राहूनच गेलं.
 हसत राहीलो , हसवत राहिलो
 तिला दरवेळी , दर भेटीला .
 तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
 माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं
 राहूनचं गेलं.
 ती आली की वेळही
 उडून जायचा मला न समजता .
 पण,
 त्या दिवशी ती आली आणि निघाली
 त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं ...

"तूच"माझी झाली असतीस.......... Tuch Mazi Zali Asti

आज"ती"म्हणाली......
 मी देवाकडे तुझा सुख मागितला.......
 मी मनातल्या मनात हसलो.......

 "ती"पुन्हा म्हणाली,
 मी तुझ्या साठी चांगली जीवन साथी मागितली...

 माझा मन मला म्हंटला........
 देवाला हे मला द्यायचच असत तर......
 तुला हे कधी मागवा लागलच नसत...

 कारण मग"तूच"माझी झाली असतीस........

प्रेम.......... Prem

प्रेम पहिल्या नजरेचं
प्रेम शेवटच्या श्वासचं

प्रेम फुललेल्या कळीचं
प्रेम जुळलेल्या जीवचं

 प्रेम पहिल्याच प्रेमाचं
 प्रेम अखेरीच्या भेटीचं

 प्रेम रेशमी अतूट बंधाचं
 प्रेम तुटलेल्या गाठीचं

 प्रेम चुकलेल्या वाटांच
 प्रेम वाटेवर चुकलेल्यांच

 प्रेम वाक्यावर शब्दांचं
 प्रेम शब्दविना वाक्याचं

 प्रेम तरुण रात्रीच
 प्रेम उमललेल्या दिवसांचं

 प्रेम त्याच आणि तिचं
 आणि अखेर प्रेम ……...जसं माझं तुझ्या वरचं ............!!!

प्रेम


प्रेम झाले तुझ्यावर
 प्रेम माझ्याशी करशील का?
 तुझ्या त्या सुंदर डोळ्यात
 भरुन मजला घेशील का?
 तुझ्याच स्वप्नांत काढतो रात्र मी
 स्वप्नांच्या अर्थ करशील का?
 कृष्नाची झाली राधा
 तशी माझी तु होशील का ?

तिच्या प्रेमात पडतांना..................Tichya Premat Padtana

'प्रेमात पडतांना'
 तिच्या प्रेमात पडतांना
 तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
 तोंड दुखेपर्यंत बडबडलो
 पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.

 तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
 तिच्या नजरेला नजर भिडवतांना
 तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.

 तिच्या हाताचा, ओठणीचा,
 स्पर्श हवाहवासा वाटतो
 सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
 हा विषय काढायचं राहूनच गेलं.

 हसत राहीलो, हसवत राहिलो
 तिला दरवेळी, दर भेटीला.
 तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
 माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.

 ती आली की वेळही
 उडून जायचा मला न समजता.
 पण,
 त्या दिवशी ती आली आणि निघाली
 त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...

ब्रेकअप..............Breakup

कधीच न्हवत वाटल.............
 कधीच न्हवत वाटल मला
 अस पण घडल
 चार दिवसाच्या प्रेमासाठी
 आयुष्यभर रडल
 ... नेहमी मला म्हणायची ती
 डिअर आपण वेगळ नाही व्हायच
 लग्न करून आपण खुप सुखात रहायच
 कितीही झाला विरोध तरी
 लग्न नाही मोडायच
 आपल हे सुंदर प्रेम अर्ध्यावर
 कधी च नाही सोडायच
 अशा तिच्या गप्पा गोष्टी
 मला नेहमीच छान वाटायच्या
 आणि दूर स्वप्नात घेउन मला जायच्या
 मी सुद्धा वेड्या सारखा खुश होउन जायचो
 दिवस रात्र तिच्याशिच गप्पा मारत बसायचो
 आठउन तीच बोलन खुप खुप हसायचो
 आणि येनारया प्रतेक स्थलाला नकार मी दयायचो
 दोन दिवस तिचा एस एम एस नाही आला
 म्हणून मीच तिला बाहेरून कॉल केला
 घरातील फोन आणि मोबाइल सगळ
 स्विच ऑफ होत
 भारावलेल्या माझ्या मनाला काहीच सुचत न्हवत
 तिच्या क्वालिनित गेल्यावर समजल
 तीच लग्न ठरलय
 एंगेजमेंट साठी पाहुन्यान्नी सार घर भरलय
 थरथरत्या पाउलान्नी
 मी तिच्या घरी गेलो
 ती त्या मुलाला पेढे चारतेय पाहून
 भाराउन च गेलो
 परक्या पाहून्या सारखी ती
 माझ्या कड़े पहात होती
 आणि माझ्या डोळ्यातील आसव
 ओठा वर येत होती ......
 खुप खुप रडलो पण तिला माया येत न्हवती
 कारण ती तर फ़क्त गरजे पुरतीच जवळ होती

बोलण्यासारखे खुप आहे, Bolnya Sarkhe Khup Aahe.

बोलण्यासारखे खुप आहे, सांगण्यासारखे काहीच नाही;
 करण्यासारखे खुप आहे, होण्यासारखे काहीच नाही.....

 कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
 सोसण्यासारखे खुप आहे, दुखण्यासारखे काहीच नाही.....
 ...
 उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
 मी दिसलो नाही तुला तर, बघण्यासारखे काहीच नाही.....

 तुला नेहमीच वाटत असेल, मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
 समजण्यासारखे खुप आहे, कळण्यास अवघड काहीच नाही.....

 माझ्या नेत्रांतील आसवांची, तुला काय किंमत;
 मानले तर अमृताचे थेंब आहेत, नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत

प्रेम हा असा शब्द आहे

प्रेम हा असा शब्द आहे कि जो
एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही

 आणि जर

 एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही

 आणि जर

 त्या दोघांना हि समजला तर जगाला समजत नाही

 हा असा शब्द आहे कि जो

 एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही

 आणि जर

 एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही

 आणि जर

 त्या दोघांना हि समजला तर जगाला समजत नाही

प्रेम शोधत आहे ........... Prem Shodhat Aahe

तुला आठवतं ते आपलं नेहमीचं हॉटेल
 आणि तेच सर्वात मागचं टेबल ..
 त्यावर आज थोडी धूळ साचलेली.
 हळुवार हात फिरवला ..तर ..
 तेच तू काढलेलं आपलं छोटंसं गाव .....आणि त्यावर लिहिलेलं दोघांचे नाव....!
 अन ..मन माझं पुन्हा एकदा मागे गेलं..
 अगदी एकदम सर्वकाही काल घडल्या सारखं
 जाळीदार पानावर पहाटेचं दव पडल्यासारखं
 मला तुझं प्रेम कळावे म्हणून तू केलेला शब्दांचा खेळआणि सर्व समजूनही मी राहिलेलो अबोल ....!
 मला आवडणारा ड्रेस तू घातलेला ..
 पण जाणवू दिला नाही मी प्रसंग माझेवर बेतलेला ..
 मलाही समजत होतं..
 मी आलेवर ..मी येते म्हणणारी तुझी मैत्रीण हुशार ..आणि तू दिसलेवर माझे मित्रही होणार लगेच पसार ..
 रोज अजून थोडावेळ थांबू ना .. बोलणारी तू ...
 अन घरी जाण्याची घाई करणारा मी ..
 दोघामध्ये एकच घेतलेला तो चहाचा कप ...!तोही केविलवाणे हसत बघायचा माझेकडे ....!
 डोळ्यात डोळे घालून ..आयुष्यभर साथ देशील ..
 असे विचारणारी तुझी भावूक नजर ..
 प्रतीक्षा माझ्या उत्तराची ..
 अन ..उत्तर ऐकताच ..केलेली घाई अश्रू लपवण्याची ....!!
 तुला नाही म्हणून गेलो तुझे पासून दूर ..
 घरी आलेवर भरून आला अश्रूंचा पूर ..
 आता चहाच्या चटक्याने भानावर आलो ...स्वप्नं सारे भूतकाळात विसरून गेलो ..
 पण ..
 या सगळ्यातून बाहेर आलेला मी ..
 कायम तुझेसाठी कुढत आहे ..
 आणि त्या चहाच्या कपात अजूनही ..तुझंच प्रेम शोधत आहे .....!!