Sunday, December 11, 2011

कुठे गेले ते दिवस .. Kuthe Gele Te Diwas

कुठे गेले ते दिवस ..
जेव्हा मी तुला भेटत होतो ..
तु जरी उशिराने आलीस ..
तरी तुला मात्र समजूण घेत होतो ..
एकदा मला भेटलीस की ..
बोलण तुझ संपत नव्हत ..
रडतानाही हसण तुझ्या ..
गालावर विरघळत होत ..
लाजण तुझ कमी नव्हत ..
पण गालावरच्या खळीमागे ..
ते ही हळूच दडून बसत होत ..
राग तर तुझ्या ..
नाकावरच्या शेङयावर होता ..
कितीही उपाय केले तरीही
तो काही कमी होत नव्हता ..
रागात तर तु फार ..
सुंदर दिसत होतीस ..
म्हणुन तर मला तु ..
तुझ्या रागासकट हवी होतीस....

No comments:

Post a Comment