Sunday, December 11, 2011

तिच्या प्रेमात पडतांना... Tichay Premat Padtana

तिच्या प्रेमात पडतांना
 तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
 तोंड दुखेपर्यंत बडबडलो
 पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं .
 तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
 तिच्या नजरेला नजर भिडवतांना
 तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं .
 तिच्या हाताचा, ओठणीचा,
 स्पर्श हवाहवासा वाटतो
 सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
 हा विषय काढायचं राहूनच गेलं.
 हसत राहीलो , हसवत राहिलो
 तिला दरवेळी , दर भेटीला .
 तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
 माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं
 राहूनचं गेलं.
 ती आली की वेळही
 उडून जायचा मला न समजता .
 पण,
 त्या दिवशी ती आली आणि निघाली
 त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं ...

No comments:

Post a Comment