Thursday, September 1, 2011

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात.. Tumhi Tichyavar Prem Karta.

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,
तर हे प्रेम नाही हा तर मोह.....!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,
तर हे प्रेम नाही ही तर वासना....!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,
...तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!
जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम....!
जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,
तर ते आहे प्रेम....!
जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता....,
तर ते आहे प्रेम....!
जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता
पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,
तर ते आहे प्रेम
♥~♥दिवसातुन एकदा तरी....
तुला पाहवासा वाटतं!!!!
त्यासाठी मला तुझा...
आरसा होऊन राहवासा वाटतं!!!!♥~♥

प्रेमाची एक गम्मत असते.....

प्रेमाची एक गम्मत असते.....!
सुरूवात त्याची डोळ्यांनी होते
मग ते हृदयापर्यंत जाऊन पोहोचते
आधी नाही-नाही नंतर हो हे उत्तर असते
प्रेमाची हि एक गम्मत असते.....
डोळ्यांनी जे म्हटलं ते ओठांवर यायला उशीर होतो
दिलीच साथ ओठांनी तर आपण नेमके दुसरे बोलतो
मग त्रास हा त्याचा नेमका आपण करून घेतो
प्रेमात सर्वांचे हे असेच होते
कारण, प्रेमाची एक गम्मत असते.....

तो तिला पहायचा To Tila Pahaycha

तो तिला पहायचा,सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची,पण न पाहिल्यासारखं
कॉलेग मध्ये ती त्याला सहजपणे दिसायची,
ती,त्याला दिसेल,असंच बसायची
पुरे झालं मौनव्रत,बस्स झालं आता
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाल
हातात गुलाब,मनात निश्चय,आणि ढोल बडवत तो निघाला
तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा
पण,शब्द बाहेर पडले"गुलकंद छान होतो ह्याचा!"
डोळ्यात अश्रू च झालाळले
आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
तर ती पूर्वीप्रमाणे हळूच हसते
हि कथा
तिच्या पुस्तकात जपून ठेवलेल्या त्याचे तेच गुलाबाची