Sunday, June 26, 2011
तू माझ्याशी लग्न करशील….????
तू माझ्याशी लग्न करशील….????
एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.
मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….
मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..
तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील…
यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखया म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नस मान्यता देतील.
पण जीवनाशी तडजोड करणार्या श्रीमनताशी,
काय तू जीवांभरच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुळशी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….
तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..
हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण……….
एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….
ती : "मस्त ना?
ती : "मस्त ना?
पाउस म्हणजे थंड वारा..."
तो : "नाही गं
पाउस म्हणजे चिखल सारा..."
ती : "गप रे....
पाउस म्हणजे हिरवीगार झाडं..."
तो : "अगं पाउस म्हणजे..
ट्रेनचे वांदे आणि ऑटोरिक्षाचं भाडं...."
ती : "सुधारणार नाहीस तू
पाउस म्हणजे वेडी सर....."
तो : "हा हा...
पाउस म्हणजे कपड्यांवर चिखलाची भर...."
ती : "पाउस म्हणजे
भिजलेल्या मातीचा गंध..."
तो : "हा हा मातीचा गंध,
पाउस म्हणजे जायचे यायचे वांदे,पण office नाही बंद.."
शेवटी ती:-"किती bore आहेस रे तू?
जा मला नाही बोलायचं तुझ्याशी."
हे ऐकून त्याने तिच्या कानात काहीतरी सांगितले,
ती गालातल्या गालात सुंदर लाजली अन त्याला बिलगली.
तो म्हणालेला:-"हे बघ,तुझ्यासाठी पाउस म्हणजे जे असेल ते असेल,
पण माझ्यासाठी
"तुच माझी सर,अन तूच माझा पाउस,
फक्त मला कधीहि सोडून नको जाउस."
याला म्हणतात,"सौ सोनार कि,और एक लोहार कि."
रूपारेलमध्ये असताना... (Ruparel madhe astana)
रूपारेलमध्ये असताना...
रूपारेलमध्ये असतानाची गोष्ट
ती मला खूप खूप आवडायची
हसताना गालावर तिच्या
अगदी गोड खळी पडायची
नुसत्या स्पर्शानेदेखील जसं
मिटून जातं लाजाळुचं पान
तशीच तिच्या येण्याची चाहूल
हरपून टाकायची माझं भान
तिचं कॉलेज सकाळचं म्हणून
मीसुद्धा लवकर उठायचो
ती यायची ट्रेनने म्हणून
मीही मग ट्रेननेच जायचो
गणिताचे सर, इंग्लिशच्या मॅडम
सारयासारयात तीच दिसायची
कधी कधी तर वर्गातसुद्धा
चक्क बाजुला येऊन बसायची
लायब्ररीत तर दिवसभर फक्त
ती असायची म्हणूनच जायचो
कधी कधी तर लेक्चर बुडवून
लायब्ररीतच बसून रहायचो
कॅन्टीनमध्ये कधी समोर आली ना
की पोटात खोल खड्डा व्हायचा
डोळे मिटून घेतले तरीही
तिचाच चेहरा समोर यायचा
जातो आताही अधूनमधून
रूपारेलच्या फाटकासमोरून
ती नसते अन नसते तिची चाहून
असतं फक्त भर दुपारचं उदास ऊन..
Subscribe to:
Posts (Atom)