Wednesday, April 18, 2012

प्रेमात पडणं... Prem


शिकवलंस तू मला प्रेमात पडणं...
 वेड्यासारखं प्रेम करणं तुझ्यावर,
 अन् प्रेमात तुझ्या वेड होण..!
 शिकवलंस तू मला असंच प्रेमात पडणं..."
 "पण सोडून तू गेल्यावर...
 ... ... सावरायचं कसं,
 विसरून तुला आता एकट चालायचं कसं,
 हे मला कधी जमलेच नाही...!
 सोडून तू गेल्यावर,
 तुझ्याशिवाय जगायचं कसं...,
 हरवलेलं मन माझं, शोधायचं कसं...,
 हे तू मला कधी शिकवलंस नाही...!"

तू नक्की हो म्हणशील !!... Tu Nakki Ho Mhanshil





तू नक्की हो म्हणशील !!
तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे ,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत आहे
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे ,
तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे ?
मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो ,
गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदर वाटतो
चित्त माझं उडायला तूच कारणीभूत आहेस ,
तुझी चूक नाही कारण हे होणं साहजिक आहे
तुझा चेहरा काही करून नजरे आड जात नाही ,
रात्री झोपू आणि दिवसा चैन देत नाही
तुला माहित नाही पण हे तुझ्यावरचा प्रेम आहे ,
कारण तुला हे समजणं खूप कठीण आहे
गुलाबी कागदावर लिहू का रक्ताने उमटवून देऊ ,
प्रेम करतो तुझ्यावर हे कसे तुला सांगू ?
मला नाही म्हण्याला तुला एक सेकंद लागेल ,
पण मला त्यातून सावरायला हा जन्म कमी पडेल
माझी हीं अवस्था तू नक्की समजून घेशील ,
खात्री आहे की तू मला नक्की हो म्हणशील !



By ---योगेश कविराज

तुझी आठवण येते...Tuzi Athvan Yete

तुझी आठवण येते....

कितीही विसरावं असं म्हणालो तरी,

का... कुणास ठाऊक पण...।

तुझी आठवण येते....

एकट्यानेच चालताना वाटेवरूनही,

तू सोबत असल्याची खोटी जाणीव होते आणि मग...।

का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते

....
अचानक येऊन जातो एखादा मेसेज ह्या मोबाईलवर,


आणि तो तुझा नसल्याची खंत वाटून जाते आणि मग...।


का... कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते....






































मनाला एकदा आसेच विचारले..!!!.........Manala Asech Vicharle


मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
...मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.

तुझी आठवण येते तेव्हा.... Tuzi Athvan Yete Tevha


तुझी आठवण येते तेव्हा..
जेव्हा मी एकटा असतो,
मग मी मनात तुझ्याच बरोबर बोलत असतो...

तुझी आठवण आल्यावर वाटत तुही माझी आठवण काढत असशील,
...आणि आरश्यात तू माझेच प्रतिबिंब पाहत असशील...

तुला काय सांगू किती तुझी आठवण येते,
तुझीच आठवण दिवस रात्र येते असे मलाच का होते...

तुला काय सांगू किती तुझी आठवण येते……………..