शिकवलंस तू मला प्रेमात पडणं...
वेड्यासारखं प्रेम करणं तुझ्यावर,
अन् प्रेमात तुझ्या वेड होण..!
शिकवलंस तू मला असंच प्रेमात पडणं..."
"पण सोडून तू गेल्यावर...
... ... सावरायचं कसं,
विसरून तुला आता एकट चालायचं कसं,
हे मला कधी जमलेच नाही...!
सोडून तू गेल्यावर,
तुझ्याशिवाय जगायचं कसं...,
हरवलेलं मन माझं, शोधायचं कसं...,
हे तू मला कधी शिकवलंस नाही...!"
No comments:
Post a Comment