Saturday, September 17, 2011

का अशी करतेस

का अशी करतेस
का माझी परीक्षा घेतेस
......
हे माहीती असुन तुला
प्रेम करतो तुझ्यावर
का माझ्या बोलण्याची वाट बघतेस
का ग सखे का अशी करतेस
प्रेम तुझ्यावर एवढे करतो
की न एइकन्यास जीव घाबरतो
म्हणुन सखे माझ्या बोल्न्यास विलंब होतो
म्हणुन सांगतो, का बोलण्याची वाट बघतेस
का ग सखे का अशी करतेस
का ग अशी छळतेस
उमजुन आलेच असेल तुला
जपतो कीती मी हृदयात तुला
माहीती असेलच तुला
प्रेम म्हणतात ह्याला
मग का अशी करतेस
का ग सखे का अशी करतेस
प्रेम हे व्यक्त करने जरूरी आहे का
गहरा भाव मझ्या डोळयातला समजत नाही का
माझे खरे प्रेम असेल
तर तुला जरूर उमजेल
आणी उमजले आहेच
तरी अशी करतेस
का ग सखे का अशी करतेस..........

अशीच रोज ती मला लपून पाहते...

अशीच रोज ती मला लपून पाहते... पहावया नको कुणी जपून पाहते... मनातले अनेकदा लिहून फाडले तरी पुन्हा मनातले लिहून पाहते...

प्रेमामध्ये पडून कोणी पहिल्यासारख रडत नाही

आजकाल पाउस पाहिजेल तसा पडत नाही
प्रेमामध्ये पडून कोणी पहिल्यासारख रडत नाही
प्रेम म्हणजे फक्त टाईमपास झाल
पहिल्या पावसासारख तेही वाहूनच गेल
तू भेट अथवा नको भेटूस
मला काही फरक नाही पडत
तुझ्या आयुष्यातून जाण्याने
आता मी नाही रडत .
वासना आणि प्रेम यातला
फरक कोणालाही नाही कळत
वासानाविरहित प्रेम करन
इथे कोणाला नाही टळत.
दोन दिवसाची भेट चार दिवसाच बोलन
तिच्या एका किस साठी तिच्यापुढे डोलन
प्रेम म्हणजे फक्त टाईमपास झाल
पहिल्या पावसासारख तेही वाहूनच गेल.
माझ तुझ्यावर प्रेम आहे
तुझ्यासाठी काहीही करेल
आता म्हणतोस,तुझ्यासाठी केल तर
स्वतःसाठी काय उरेल.
प्रेम नव्हत ते फक्त आकर्षण होत
नजरेच तुझ माझ्या शरीराशी घर्षण होत........

I Love You

669966666669999996669999996669966669966669999666669966669966
669966666699999999699999999669966669966699669966669966669966
669966666669999999999999996669966669966996666996669966669966
669966666666699999999999966666699996666996666996669966669966
669966666666666999999996666666669966666996666996669966669966
669966666666666669999666666666669966666699669966669966669966
669966666666666666996666666666669966666669999666666999999666
1.) press ctrl+f
2.) then type 6
3.) click highlight

तुझ्याशी बोलताना,

तुझ्याशी बोलताना,
मी तुझ्या डोळ्यात पाहतो,
फक्त मीच त्या पाण्यात नाहतो.
जेव्हा पापणी लवते,
...त्याच पाणी रूपात तुझ्या ओठी येतो,
हळूच ओठ पाणीदार होतात,
मग त्याच ओठांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.
त्याचवेळी तू मला अडवतेस,
अडवताना लाजतेस,
थोडी दूर जातेस, पण नंतर हातात हात धरतेस,
मग हीच लाज माझी धिटाई बनते.
जेव्हा मी घरी जाण्यास निघतो,
तेव्हा तुझ्या चेहरयावरचे हास्याच गमावते,
मग ते परत आणण्यासाठी तुला भेटण्याचे वचन देतो,
आणि त्या क्षणाची आठवण घेऊन अश्रू सावरतो

स्वप्नं

परवा एका मित्राने विचारल...
 "सगळ्यात जास्त काय करायला आवडतं तुला?"
 मी म्हटलं, "स्वप्न पहायला..
 यावर सगळे हसू लागले..
 वेडायस म्हणाले..
 मीही हसलो..
 .
 पण
 खरच..
 मला स्वप्नं पहायला
 खूप आवडत..
 .
 कारण
 .
 ती एकच
 जागा उरलीये
 .
 जिथे ती
 अजुनही
 भेटते
 मला
 .
 .
 .
 न चुकता.!!

श्वास

आपण कित्तेकदा भेटलो??
एकमेकांशी मनातलं बोललो !
आपण कित्तेकदा भेटलो
बोलता बोलता कित्तेकदा भांडणही झाली.
त्या नंतर हि तू कित्तेकदा भेटावयास आली.
... काल अचानक तू अशी का वागली?
काल अचानक तू अशी का वागली?

तुझ्या या वागण्या ने माझ्या काळजास आग लागली.
अन पेटलेले काळीज मी पुन्हा विझावन्याचा प्रयत्न केला .
तो प्रयास हि तुझ्या आगी पुढे वाया गेला.

मी नुस्त जळत जायचं .
जाळून राख झाल्यावर तुझ्या कडे कसं पहायचं?
माफ कर विसरलो मी कि,तुला पाहता येणार नाही.

पण
तुला पाहिल्या विना शेवटचा श्वास हि घेता येणार नाही .

आठवण तुझी

विसरलो मी कालचे
 माझे किती श्वास होते
 हात तुझा हाती अन
 सारे तुझे भास होते

 पुन्हा पुन्हा आठवतो
 मंद हळव्या क्षणांना
 माझ्यासाठी जसे काही
 जगण्याची आस होते

 लाविलेस वेड मला
 परी आता शोधू कुठे
 चोहीकडे पाहीले मी
 तुझ्याविना ओस होते

 आठवाने जेव्हा तुझ्या
 झंकारते काळीज हे
 एकेक ती आठवण
 माझ्यासाठी खास होते..

मैत्रीण मला भेटली

काल लग्न झालेली माझी मैत्रीण मला भेटली,
 सवाशनीच्या लेण्यामद्धे अजूनच सुंदर वाटली...!

 नजरा-नजर होताच ती 'पुन्हा' एकदा लाजली,
 आमच्या पहिल्या भेटीची आठवण, ताजी करून गेली...!

 "कशी आहेस?" विचारताच, नेहमीचेच उत्तर मिळाले,
 पण चेह~यावर, कुणास ठाऊक, तिने उगाच, उसने हसू आणले...!

 दोघा सौमित्रांच्या गप्पा-गोष्टी अशा काही रंगल्या,
 चेह~यावर हास्य आले...डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्या...!

 'व्यक्त न केलेल्या भावना सांगाव्या', अशी कल्पना मनात आली,
 पण माझी नजर पुन्हा एकदा तिच्या कुंकवाकडे गेली...!

 असेच काहीतरी, तिच्या मनालासुद्धा वाटले,
 पण कदाचित सप्तपदींच्या वचनांनी तिला रोखले...!

 शेवटपर्यंत दोघेही, मनातले ओठांवर आणू नाही शकले,
 साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे, पुन्हा एकदा झुकले

जगायलाच आज वेळ नाही..

सुख आहे सगळ्यांजवळ पण तेअनुभवायला वेळ नाही.
 सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण
 चार शब्द बोलायला वेळ नाही.
 इतरांकडे सोडा,पण स्वतःकडे बघायला वेळ नाही.

 जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही..

त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे.. Tyach Aplyavar Atonat Prem Aahe.

तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...मनोज वायचलेस्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! ".