Saturday, September 17, 2011

आठवण तुझी

विसरलो मी कालचे
 माझे किती श्वास होते
 हात तुझा हाती अन
 सारे तुझे भास होते

 पुन्हा पुन्हा आठवतो
 मंद हळव्या क्षणांना
 माझ्यासाठी जसे काही
 जगण्याची आस होते

 लाविलेस वेड मला
 परी आता शोधू कुठे
 चोहीकडे पाहीले मी
 तुझ्याविना ओस होते

 आठवाने जेव्हा तुझ्या
 झंकारते काळीज हे
 एकेक ती आठवण
 माझ्यासाठी खास होते..

No comments:

Post a Comment