Friday, July 29, 2011

परी ती


कल्पनेतली परीच ती
ठाउक नाही कशी ती दिसते
अशी ती असते,
कल्पनेतुनी वास्तवात येई
तशी ती कधीच नसते...

वेळी-अवेळी पाउस पडता
आनंदाने सदैव भिजते
अशी ती असते,
भिजता-भिजता
वाहून जाई
तशी ती कधीच नसते...

मदतीस तयार परांच्या
मेणापरी जळुनी थिजते
अशी ती असते,
थिजता-थिजता
उरुन जाई
तशी ती कधीच नसते...

रात्रीस फुलांच्या कुशीत
चिरनिद्रेस ती निजते
अशी ती असते,
निजता-निजता
स्वप्नात विरून जाई
तशी ती कधीच नसते...

उंच अवकाशी उड़ता
क्षणात काळ्या मातीत रूजते
अशी ती असते,
रुजता-रुजता
उमलणे विसरुनी जाई
तशी ती कधीच नसते...

कल्पनेतली परीच ती
वास्तवात कधीच नसते...
वास्तवात कधीच नसते...

तुला मी विसरु तरी कसे ? Tula MI Visru tari kase.

तुझ्या आठवनींना मिटवु तरी कसे ?
माझ्या ह्रुदयात जे तुझ घर आहे
ते घर मी माझ्याच हाताने पेटवु तरी कसे ?
आजकालचं दुख:ही मला अनमोल आहे
शेवटी ते तु दिलेलं आहे
मग मी या निर्रथक अश्रुमागे
त्याला लपऊ तरी कसे ?
मनाचे ढगही दाटुन आलेत
हे डोळेही अश्रुंचा
मुका पाऊस बरसवु लागलेत
या वेड्या मनाची तगमग
या मनाचे निर्मळ स्वप्न
मी तुला सांगु तरी कसे ?
बघ आता विजा चमकु लागल्यात
सोबत पावसाचाही जोर आहे
सांग काय करु आता ?
या वादळात बोलकी वळचण
मी शोधु तरी कुठे ?
ओठावर आलेले हे शब्द
मागे फ़िरुऊ तरी कसे ?
भर पावसातही कोरड्या या मनाला
तुझ्या विरहाने भिजवु तरी कसे ?
आता या पुढे
तुझी सोबत नसल्यावर
मग हे शब्दांचे रंग
मी उधळु तरी कसे ?
सांग तुला मी विसरु तरी कसे?

संपली हि कहाणी ...Sampali Hi Kahani


सुरु होण्याआधी संपली हि कहाणी
साक्षीला उरले फक्त डोळ्यात पाणी.
नकळत तुझे आयुष्यातून निघून जाणे
जशी फुललेली बाग क्षणात ओसाड होणे.
...
अश्रुनी दाटलेल्या डोळ्यांनी तुला शेवटचे पाहणे
भर उन्हाळ्यात मग पावसाचे आगमन होणे
. तुझ्या आठवणीने पापणीचे ओलचिंब होवून जाणे
शांत अशा सागरात लाटेचे ते उसळून येणे.
तुझ्या आठवणीरुपी सागराला शांत कसे करता येईल
हृदयात कोरलेल्या आठवणी कशा पुसता येतील..