मुलीन साठी

अपेक्षा तर काहीच ठेवल्या नव्हत्या
माहीत होत त्या कधीच पुर्ण होणार नव्हत्या
म्हणून त्यांच्या मागेही
कधी वेडी सारखी धावली नाही
पण चूक शेवटी झालीच माझ्या हातून
नाही म्हणता म्हणता शेवटी
एक म्ह्त्वाकांश्या मनाशी बाळगलीच
आणि जे नाही व्हयाच तेच झाल
दूर असूनही जितकं तुला आठवलं नसेल
तितकं तू जवळ आल्यावर तुला शोधलं
एक वेडी अशा व्हती तुझ्या बद्दलची
जी आता हळूहळू पुसटशी होत आहे
सगळच तर विरळ होत आहे
तुज भेटणं, मला शोधणारी तुझी प्रेमळ नजर
आणि कदाचित आता तुज माझ्यावरच प्रेमही......................
पण, मी हे सगळ नाही विसरू शकत
तू कधी भेटलास नाही तरी ही
आणि तुझी प्रेमळ नजरही
तुझ्या आणि माझ्या
पहिल्या नजरेवर च माझ पूर्ण जीवन अपर्ण आहे

============================================

अशीही एक मुलगी .......!

कळत नव्हते प्रेम म्हणजे काय .......?
तरी तुझ्या प्रेमात पडले मी
तुझ्या सोबत जगण्याचे
... सुन्दर स्वप्न पाहिले मी
या स्वप्नाला माझ्या डोळ्यात
सदैव साठवून ठेवले मी
स्वप्न हे स्वप्नंच असते
उशिरा हे जाणले मी
तुझ्या प्रेमात पूर्णपणे
स्वताला विसरून गेले मी
पण नशिबाला मान्य नव्हते
तुझ्या सोबत जगावे मी ........!!....

------------------------------------------------------------------------------------
खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य....
 "या जगात कोणतीही मुलगी ही तिच्या नवरयासाठी त्याची"राणी"नसेलही कदाचित...
 पण तिच्या वडिलांसाठी ती नेहमीच एक सुंदर"परी"असेल.... :D


प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक तरी असा मुलगा असतो, ज्याला ती कधीच विसरू शकत नाही.. आणि..????? .. .. .. .. .. .. .. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक तरी अशी मुलगी असते, जिला तो मिळवू शकत नाही..


 नेहमीच असतोस तू जवळपास
 पण कधीच माझ्याशी तू बोलत नाहीस
 थोडीफार विचारपूस करशील माझी
 पण असा क्षण कधीच येत नाही...
 आपल्या मधल्या भांडणाला
 तू खूप मोठा दुरावा दिलास
 चूक नसताना माझी शिक्षा फक्त मलाच देत गेलास .
 सहज पणे कोणी कोणाशी नाती तोडत नाही
 देवाच्या कृपेने जुळलेल्या बंध रेश्माला
 कोणी शब्दात तोडत नाही .
 माझ्यातल्या तुझ्या आठवणींना
 एकदा येऊन समेटून जा
 श्वास माझे मिटण्याआधी
 फ़क्त एकदा येऊन भेटून जा"
 फक्त एकदा येऊन भेटून जा"..!!!!!!!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

कधी कधी का रे तू असा वागतोस ?
असे वाटते जणू काही तू तुझ्यातच नसतोस.........

 कधी कधी शब्द तुझे,
 इतके कोरडे का होतात ?
 कधी कधी डोळे तुझे
 इतके निस्तब्ध का होतात ?


 नेमकं काय होतं तुला, जेव्हा तू म्हणतोस,
 " मला काहीही झालेलं नाहीये "
 मला सांग इतक्या दिवसांत,
 काय मी तुला एवढेही ओळखलेलं नाहीये ?


 किती बरं वाटतं जेव्हा तू,
 एखाद्या गोष्टीचं कारण
 समजावून सांगतोस...
 आणि खुप अस्वस्थ होतं जेव्हा,
 मला कारण कळत नाही की,

 तू असा का वागतोस.....
 कठोर बोलून, माफ़ी मागायला
 तुझं काय जातं.....
 चूका करुन, चुकलो म्हणायला
 तुला बरं येतं.........

 पण तुला काय ठावुक त्या थोड्या वेळात
 माझं मन किती व्याकुळ होतं,
 त्या थोड्या वेळात ते अक्षरश:
 तुटून तुटून वेगळ पडतं....

 मी तुझ्या इतकी व्यवहारी नाहीये रे,
 माझं मन तुझ्या इतकं घट्ट नाहीये रे,
 तुझ्याइतका सहजपणा जर देवाने
 मला दिला असता,
 तर कदाचित आज हा प्रश्नच
 मला पडला नसता,

 मी तुला प्रश्नाचं उत्तर
 मागत नाहीये,
 पण का वागतो तू असा
 मला खरचं कळत नाहीये,

 एरव्ही, तू मला नेहमीच खुप समजुन घेतोस,
 पण कळत नाही कधी कधी तू,
 असा का वागतोस ?
---------------------------------------------------------------------------------------------------
कुणीतरी आहे तो ...
 जो शब्दाविनाही माझे मन जाणणार
 जगातले सर्वे सुख माझ्या पदरात टाकणार,

 कुणीतरी आहे तो ...
 जो कातरवेळी माझ्या मनास हळूच स्पर्शून जाईल
 अन ओळख विचारताच नुसताच हसून देईल,
 कुणीतरी आहे तो ...
 जो स्वप्नांपालीकडील विश्व मला दाखवेल
 आणी त्याच्या विश्वात रमताना मला स्वताचाहि विसर पडेल,
 कुणीतरी आहे तो ...
 ज्याच्याशिवाय सारे काही शून्य ..

-----------------------------------------------------------------------------------------------
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
 साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!

 कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
 किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!
 ... ...
 महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
 पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये!

 मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
 तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये!

 थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
 कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!

 तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
 या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत ये!

-------------------------------------------------------------------------------------------
जीवनाचे एक खरे सत्य ,,,,,,,, ;)

 एखाद्या मुलाच्या किती गर्लफ्रेंड आहेत हे कोणीही सांगू शकेल ,,
 ,
 ,
 ,
 ,पण एखाद्या मुलीचे किती बॉयफ्रेंड आहेत हे तिच्याशिवाय कुणालाच माहित नसते

---------------------------------------------------------------------------------------------
मनातले प्रेम चेह-यावर
 दिसू देत नाहीस,
 डोळ्यांनी बोलतोस पण
 ओठांवर येऊ देत नाहीस,
 तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू
 ... तरी कसा....!! सांग ना रे सख्या तू असा कसा......???
 फोनवर बरेच सांगतोस पण
 प्रेमळ काहीच बोलत नाही
 भेटीच्या तारखा ठरवतोस पण
 भेटणे काही होतच नाही
 आहेस माझा प्रियकर पण भासे जणू मित्र जसा....!!
 सांग ना रे सख्या तू असा कसा......???
 तुझ्यावर केलेली कविताही तू
 वाचून नुसता हसतोस,
 वाटतं काहीतरी बोलशील पण
 "छान" बोलून गप्प बसतोस प्रोफेशनल तुझं वागणं तू रोमांटिक
 होशीलच कसा...!!
 सांग ना रे सख्या तू असा कसा......???
 आजारी असली जरी मी तरी
 तू एकदाच फोन करतोस,
 त्यातही तब्येत विचारायची सोडून काहीतरीच बडबडत बसतोस,
 आहे जसा माझ्या मनातला राजा नाहीच
 मुळी तू तसा...!!
 सांग ना रे सख्या तू असा कसा......???
 रागावलीच मी तर
 तुला मुळीच करमत नाही, मझ्याशी बोलल्या शिवाय
 तुलाही राहवत नाही,
 समजून घेते मी तुला कारण मला हि तू
 आवडतोस असा
 सांग ना रे सख्या तू असा कसा......???

-----------------------------------------------------------------------------------
मी नाही म्हणत....
 तू फक्त माझ असाव... पण माझ्या जीवनात मात्र तुझ्या खेरीज कुणी नसाव... ♥

 मी नाही म्हणत....
 तू मलाच आठवावं.. पण तू मात्र सदैव माझ्या स्मरणात रहाव..♥

 मी नाही म्हणत....
 तू मला मनात ठेवाव... पण माझ्या मनी मात्र तूच वसाव...♥

 मी नाही म्हणत....
 तू माझ्या साठी रडावं....पण माझी पापणी मात्र तुझ्याच साठी भिजाव..♥

 मी नाही म्हणत....
 तू मला प्रेम कराव... पण कधी तरी तुलाही माझ्याच सारखा प्रेम व्हाव...

 मी नाही म्हणत....
 तू कधी हसू नये.... पण माझ्या साठी हसण्याचे कारण मात्र तूच असावं..

 मी नाही म्हणत....
 तू मला भेटाव.. पण माझ्या साठी ती भेट मला सुखी करून जाव...

 मी नाही म्हणत....
 कधी तू माझ्या साठी कविता रचावी... पण माझी लेखणी तुझ्याच आठवणीत वळावी...

 मी नाही म्हणत....
 कधी तुला मीच दिसव.... पण मला, डोळे बंद होताच स्मरणात तुझाच चित्र रेखाताव...

 मी नाही म्हणत....
 कधी तुझी भावना तुझ्यापासन दूर जावी.. पण दुख होईल मला, जर माझी भावना तुला न कळली...

 मी नाही म्हणत....
 तुझ जगन माझ्यासाठी बदलाव... पण माझ स्वप्न जगन माझ हे तुझ्या कुशीत
 पूर्ण व्हाव...

 मी नाही म्हणत....
 माझ्या भावनान सोबत खेळू नको... पण माझ तुझ्यावर खरच प्रेम आहे हे तू
 विसरू नकोस...

 मी एवढच म्हणते....
 माझ्या प्रेमाची जाणीव व्हावी.... अन पुढच्या जन्मी तरी तु माझा अन
 मी तुझी बनून यावी

1 comment: