Sunday, July 24, 2011

आयुष्याच्या वाटेवर Ayushyachya Vatevar

आयुष्याच्या वाटेवर थांबायच नसतं,
आयुष्याचे पैलतीर गाठायचं असतं,
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं,
आपल नशीब आपल्याच हाती असतं,
येताना काही आणायच नसतं,
जाताना काही न्यायचं नसतं,
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं,
याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं .