तू माझा यार
मी तुझा दोस्त
आयडिया सांगतो
तुला एकदम मस्त
सहकारी बँक काढायचा
निर्णय आपण घेऊ
संचालक मंडळात
आपलेच नातेवाईक ठेवू
जनतेच्या खिशावर
ठेवून आपला डोळा
भूलथापा देऊन
ठेवी करूया गोळा
हपापाचा माल
आपण करूया गपापा
खातेदारांचा पैसा
समजू आपल्याच बापाचा
ठेवीदारांचा पैसा
आपण आपल्यासाठीच उडवू
सर्वाच्या नाकावर टिच्चून
मग अख्खी बँक बुडवू
हात असेल आपला
पण दुसऱ्याचा बांधू गजरा
सहकाराच्या हवेलीत
स्वाहाकाराचा मुजरा
Saturday, June 4, 2011
तू माझा यार
मैत्रीच्या पावसात
मैत्रीच्या पावसात
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.
मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.
न्हाऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब
मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय
पाऊस रिमझिम हसला.
ढगांना घेउन क्षितीजावर जाउन बसला.
जाता जाता म्हणाला,
"काळजी नको. भिजून घे खूप.
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब
प्रेम आयुष्यात मिळते का???
खरच पाहिले प्रेम आयुष्यात मिळते का???
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........
होते ते प्रेम कधी बालपणात
तिच्या हसण्यात आणि लाजुन बघण्यात
समज नसते त्या प्रेमाची
त्या आतील नात्यांची
लहानपनी तरी कधी जाणवते का??????......
खरच............!!!!!!
प्रेमात लोक आंधळी होतात
पण जे प्रेम करतात तेच समजतात
पाहिले प्रेम हे काय आहे
दुधा शिवाय पाण्याला आलेली साय आहे
प्रेम हे वया प्रेमाने बदलते का??????
खरच........!!!!!!
ज्यांना भेटते ते असतात सुखी
पण न मिळाले म्हणुन रहायचे का दू:खी
हा तर नशिबाचा खेळ आहे
आणि नशिबाने घातलेला मेळ आहे
खरच पाहिले प्रेम आयुष्यभर राहते का???
खरचं...........!!!!!!!!!
माणसाने आयुष्यात कधी तरी प्रेम करावे
पण ते जर दूर गेले तर आयुष्यभर जपावे..