तू माझा यार
मी तुझा दोस्त
आयडिया सांगतो
तुला एकदम मस्त
सहकारी बँक काढायचा
निर्णय आपण घेऊ
संचालक मंडळात
आपलेच नातेवाईक ठेवू
जनतेच्या खिशावर
ठेवून आपला डोळा
भूलथापा देऊन
ठेवी करूया गोळा
हपापाचा माल
आपण करूया गपापा
खातेदारांचा पैसा
समजू आपल्याच बापाचा
ठेवीदारांचा पैसा
आपण आपल्यासाठीच उडवू
सर्वाच्या नाकावर टिच्चून
मग अख्खी बँक बुडवू
हात असेल आपला
पण दुसऱ्याचा बांधू गजरा
सहकाराच्या हवेलीत
स्वाहाकाराचा मुजरा
No comments:
Post a Comment