Sunday, June 17, 2012

सर्वस्व माझे तुलाच वाहिले


सर्वस्व माझे तुलाच वाहिले
सोडून गेलास तू
आता एकटीच राहिले
.
.
... ना कोणाची मी
ना कोण माझे आहे
आठवणीत राहणारी
फक्त माझीच मी आहे

स्वप्न नेहमी तुझेच पाहिले
तुटली स्वप्न सारी
आता वास्तव्यच राहिले
.
.
ना स्वप्नांची मी
ना स्वप्न माझे आहे
आजच्यात जगणारी
फक्त माझीच मी आहे

प्रेमात तुझ्या काव्य रचले
सुटली साथ तुझी
आता शब्दच राहिले
.
.
आहे शब्दांची मी
अन शब्द माझे आहे
शब्दांमध्ये रमणारी
फक्त माझीच मी आहे

आठवण .....Athvan


विसरण्याची ...,
हजार कारणे शोधशील तु ...
एकही सापडणार नाही ...
इतका दुरावा असेल ..,
तुझ्यात नि माझ्यात की ..,
यापुढे मी कधीही ...
आठवण तुझी काढणार नाही ...
श्वासांत मात्र उरतील ...,
श्वास तुझे ...
तेवढे मात्र ...,
शेवट पर्यंत जपणार मी ...
त्यावर तुझा हक्क ...,
कदापि असणार नाही ...!!

आठवण... Tuzi Athvan


दिवस सरत जाणार पण,
तुझी आठवण नाही सरणार..

एक आठवण गेली तरी,
तुझी दुसरी आठवण मनावर ताबा घेणार..

तुला विसरण्याचा मी,
उगाचं एक खोटा प्रयत्न करणार..

आणि जगण्याची इच्छा नसतानाही,
तुझी आठवण जपण्यासाठी जगात राहणार

आठवण


आठवणीत नाही ठेवलीस तरी चालेल,
पण विसरायचा प्रयत्न करू नको,
नाही बोललीस तरी चालेल,
पण लक्ष नसल्याचा बहाणा करू नको