Friday, August 26, 2011

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी, Preyasi

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
प्रेमाला प्रेम
समजणारी ती प्रेयसी
असावी
मी जसा आहे तसेच,
माझ्यावर प्रेम करणारी
असावी
चश्मेबद्दुर .. खुबसुरत
नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी
असावी
ग़ालिबाची शेर -ए-गझल
नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी
असावी
यश-राज पिक्चरची
हिरॉईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी
नाईका असावी
बागेतल्या फुलांसारखी
सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या
तुळसेसारखी पवित्र
असावी
हाय... हेलो... नया दौर
असला तरी
नव्या जुन्याची सांगड
घालणारी असावी
ड्रीम-गर्ल नसे ना ...पण
मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक
धाग्यांना हळुवार
जपणारी असावी
ओळख असून सुद्धा
अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात
माझी धडपड चालावी
केव्हातरी कुठेतरी ती
भरभरून व्यक्त होणारी
असावी
मनाचे गुपित मग
डोळ्यांनीच सांगणारी
असावी
थोडी खट्टी...थोडी मिठी
असावी
तिच्या लटक्या रुसण्या
फुगण्यात मज्जा असावी
हसताना गोबऱ्या गालावर
नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा
पाडण्याची मग माझी रीतच
व्हावी
इवल्याश्या नाकावर राग
घेऊन वाट पाहणारी
असावी
मी उशीर केला तर मग
माझ्यात मिठीत रडणारी
असावी
चोरून चोरून भेटायला
येणारी असावी
हातात हात घालून मग
सगळ्यांसमोर फिरणारी
असावी
तिच्यासोबत आयुष्य ही
एक वेगळीच बात असवी
सुख आणि दुःखात सदा
दोघांची साथ असावी
जितकी कोमल तितकीच
कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे
आयुष्य फुलवणारी असावी
आयुष्याच्या अनेक
वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या
वाटेवर नव्या
स्वप्नांची ती उमेद
असावी
प्रेमाला प्रेम
समजणारी ती प्रेयसी
असावी
मी जसा आहे तसेच,
माझ्यावर प्रेम करणारी
असावी
तेल आणि वात यांसारखी
आमची जोडी असावी,
एकरूप होऊन जळताना
इतरांना प्रकाश देणारी
असावी

प्रेम कधी मागून मिळत नाही prem kadhi magun milat nahi

प्रेम कधी मागून मिळत नाही
प्रेम कधी मागून मिळत नाही .........
प्रेम कधी मागून मिळत नाही
ते आतून जाणवावं लागतं,
...नजरेतून कळलं तरी
शब्दांतून सांगावं लागतं...
रोज तुझी आठवण येते आणि
रोज डोळ्यांत पाणी उभं राह्तं,
तू जवळ हवीस असं वाटताना
खूप दूर आहेस,हे सांगून जातं...
कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात,
पापण्यांची अबोल किलबिल होते
आणि शब्द डोळ्यांतच उमटतात...
माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा
म्हणून मी शब्दांची वाट धरली,
ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस
या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली?
का,कोणासाठी इतके वाटावे?
का,कोणासाठी इतके झुरावे?
अनोळखी,तरीही परिचित असावे,
यालाच का "प्रेम" म्हणावे?
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघिनाही सांगता येत नाही,
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्द् माञ ओठांत येत नाहीत.......{

प्रेम Prem

मी एकदा माझ्या हृदयाशी बोलत होतो...!!!
मी माझ्या हृदयाला विचारले...???
“तुला मी बिल्कुल आवडत नाही काय रे...??”
...माझ्या हृदयातून आवाज आला
“नाही रे पण तू असे का विचारात आहेस मला..??”
मी:“तू मला खूप दुखवतोस”
हृदय:मी..!! आणि मी तुला केव्हा,कसे दुखवले..??
माझ्या डोळ्यातून दोन थेंब पाणी आले
.
.
मी: “मग तू प्रत्येक वेळी तू मला चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात का पाडतोस..??”

प्रेम हे फुलपाखरासारखे असते

"प्रेम हे फुलपाखरासारखे असते ♥ , जेव्हा तुम्ही त्याला पकडायला जाता,
ते दुसरीकडे उडते, पण जेव्हा तुम्ही काही न
करता स्तब्ध उभे रहाता, तेव्हा ते येते
आणि तुम्हाला स्पर्श करते ♥ ....
म्हणून प्रेमाच्या मागे धावण्यापेक्षा वाट
पाहुयात आपल्या आपल्या फुलपाखराची ... नाही का ?'