Tuesday, June 14, 2011

सुंदर नाजूक उठून दिसेल ती , (Sundar Najuk)


सुंदर नाजूक उठून दिसेल ती ,
गालावर सुरेखा खाली पाडून हसेल ती ,
करणा नसताना खोटीच रुसेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!

एकुलती एक कि सर्वात थोरली असेल ती ,
नाहीतर कदाचित सर्वात धाकटी असेल ती ,
संसार कसा सांभाळेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!

फ्याशन करील की संस्कृती पळेल ती ,
परंपरा जोडेल कि परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!

थोडी खट्याळ ,नखरेल ,लबाड असेल का ती ,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती ,
एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!

एवढं छोटं आयुष्य सहज जगेल का ती ,
आभाळा एवढं दु:ख सहज सोसेल का ती ,
दु:खातही न तुटता हसेल का ती ,
काय माहित कशी असेल ती !!!!!!!!!


एक छानशी गोष्ट :
सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं ,
एका लहानग्याला किनार्‍यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं.
आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला
तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.
न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, "समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??..
मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?"
त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, "यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही.
पण या माशाला विचारा, "त्याला काय फ़रक पडला?" ज्याचा मी नुकताच जीव वाचवला..!

प्रेम prem

♥ प्रियकर :- आपले प्रेम हे हाथ आणि डोळे ह्या मध्ये असणाऱ्या नाजूक नात्या सारखे आहे.
प्रेयसी :- म्हणजे कसे ?
प्रियकर :- म्हणजे असे कि बघ........♥
जेव्हा हाथ दुखतात तेव्हा डोळे रडतात
आणि जेव्हा डोळे रडतात तेव्हा तेच हाथ त्याचे आश्रू पुसतात. ♥

तुझ्यावर प्रेम करणारा ... Tuzyavar premkarnara

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण," ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !
तुला हसवणारे बरेच असतील पण,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन !

लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण,
" जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन !

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण,
तू रडताना,तुझा... हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन !

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण,
तुझ्या नकळत तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच असेन.

निघालीसच सखे , तर
आज तशी तू जाऊ नको
माझी ओंजळ हाती घेतल्याशिवाय
निरोप माझा घेऊ नको
माझ्या ओंजळीतली चार फुलं
...वेणीमध्ये खोचून जा
'तूझी रे ... काही क्षणतरी ..'
असं एकदाच लाजून सांगून जा

** अंतर ** Antar

** अंतर **

आपल्यातलं अंतर
वेळेआधीच
कमी होईल
ह्या भीतीने मी
रात्रंदिवस आपल्यांत अंतर ठेवायचे..

वेळेतच मग
देवाकडे आंतरपाट मागितलं
तर,
त्याने आपल्यालाच अंतर दिलं

अशी वेळ आली की,
आता..
भीती संपली
रात्र जळाली
दिवस विझले
नयन भिजले

आणि , उरलंय फक्त अंतर..
फक्त अंतर
कायमचं..
आपल्यात....

नाही जमणार तुला. Nahi samznar tula

नाही जमणार तुला माझं मन सांभाळणे
नाही सहन होणार तुला माझं रागावणं
नाही आवडणार कदाचित माझं विचित्र वागणं
बेधुंद बेदरकार बेफिकीर असणारं माझं जगणं!!!!!!!

नाही कळणार तुला माझ्या मनाचा भाव
नाही घेता येणार तुला माझ्या हृदयाचा ठाव
नाही आवडणार कदाचित माझ्या प्रेमाचा गाव
वादळवाऱ्यात भर समुद्रात असणारी सुसज्ज नाव !!

लव्हलेटर .. Loveletter


लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं
सरळ जाऊन बोलण्यापेक्ष इझी आणि बेटर असतं
गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक सॉंग असतं
ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं
सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं
आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं
पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं
शक्य शक्य हातांमधून थथरणारा वर्ड असतं
नुकतंच पंख फ़ुटलेलं क्युट क्युट बर्ड असतं
होपफ़ुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं
५०% सर्टन आणि ५०% चं जजमेन्ट असतं
ऑपोनन्टच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेन्ड असतं
सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेन्ड नसतं
हार्ट देऊन हार्ट घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं!!

लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे एक ड्रीम असतं
लाईफ़च्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं
अर्धं अर्धं प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं
तिसयासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असत.

मी आहे हा असा. Mi aahe ha asa

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...
अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नाहीतर नीघून जा...
पुरणपोळी चाख्रतो मी, तंगडीदेखील तोडतो मी.
हिंदी सिनेमे पाहतो मी, विंग्रजीसुद्धा झाडतो मी,
'दादांना' मात्र तोड नाही एवढेच फक्त मानतो मी.
शिव्या सुद्धा देतो मी, कविता देखील करतो मी,
कधी कुणालाही हरवतो मी, कधी जिंकता जिंकता हरतो मी.
अध्यात्मावर बोलतो मी, फ्लर्टिंगसुद्धा करतो मी,
मी मी करतो मी, कधी सेल्फलेस देखील होतो मी.
प्रेम करत नाही कुणी म्हणून डिप्रेस्स सुद्धा होतो मी,स्वःतालाच समजावतो मग, "नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!"
कधी देवाशी बोलतो मी, कधी मौनाला धरतो मी,
जिवलग एखादा चुकलाच तर लेक्चर सुद्धा झाडतो मी.
प्रश्न सगळ्या जगाचे सोडवायला, नेहमीच असतो उत्सुक मी,
स्वःताचे प्रश्न सोयीने मात्र, अनुत्तरीतच ठेवतो मी.
" आपलं आयुष्य वेगळं, आपली दुःख वेगळी!"
नेहमी स्वःताच्याच कक्षेत फिरतो मी.....
सभोवती मात्र जेव्हा, असहाय्य दीन पाहतो मी,
ख्ररच, स्वःताला खूप भाग्यवंत समजतो मी.
मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या