नाही जमणार तुला माझं मन सांभाळणे
नाही सहन होणार तुला माझं रागावणं
नाही आवडणार कदाचित माझं विचित्र वागणं
बेधुंद बेदरकार बेफिकीर असणारं माझं जगणं!!!!!!!
नाही कळणार तुला माझ्या मनाचा भाव
नाही घेता येणार तुला माझ्या हृदयाचा ठाव
नाही आवडणार कदाचित माझ्या प्रेमाचा गाव
वादळवाऱ्यात भर समुद्रात असणारी सुसज्ज नाव !!
No comments:
Post a Comment