Sunday, December 11, 2011

ब्रेकअप..............Breakup

कधीच न्हवत वाटल.............
 कधीच न्हवत वाटल मला
 अस पण घडल
 चार दिवसाच्या प्रेमासाठी
 आयुष्यभर रडल
 ... नेहमी मला म्हणायची ती
 डिअर आपण वेगळ नाही व्हायच
 लग्न करून आपण खुप सुखात रहायच
 कितीही झाला विरोध तरी
 लग्न नाही मोडायच
 आपल हे सुंदर प्रेम अर्ध्यावर
 कधी च नाही सोडायच
 अशा तिच्या गप्पा गोष्टी
 मला नेहमीच छान वाटायच्या
 आणि दूर स्वप्नात घेउन मला जायच्या
 मी सुद्धा वेड्या सारखा खुश होउन जायचो
 दिवस रात्र तिच्याशिच गप्पा मारत बसायचो
 आठउन तीच बोलन खुप खुप हसायचो
 आणि येनारया प्रतेक स्थलाला नकार मी दयायचो
 दोन दिवस तिचा एस एम एस नाही आला
 म्हणून मीच तिला बाहेरून कॉल केला
 घरातील फोन आणि मोबाइल सगळ
 स्विच ऑफ होत
 भारावलेल्या माझ्या मनाला काहीच सुचत न्हवत
 तिच्या क्वालिनित गेल्यावर समजल
 तीच लग्न ठरलय
 एंगेजमेंट साठी पाहुन्यान्नी सार घर भरलय
 थरथरत्या पाउलान्नी
 मी तिच्या घरी गेलो
 ती त्या मुलाला पेढे चारतेय पाहून
 भाराउन च गेलो
 परक्या पाहून्या सारखी ती
 माझ्या कड़े पहात होती
 आणि माझ्या डोळ्यातील आसव
 ओठा वर येत होती ......
 खुप खुप रडलो पण तिला माया येत न्हवती
 कारण ती तर फ़क्त गरजे पुरतीच जवळ होती

No comments:

Post a Comment