मनात माझ्या तुझीच आठवण
मनात माझ्या तुझीच वाट
मनातच आहे सगळं काही
मनात माझ्या तुझे विचार दाट
... सामावून मी ठेवलंय सगळंच
ह्रिदयाच्या आतल्या आत
कसं सांगू ग सजनी
तू आहेस मनातल्या मनात
शांत तुझा स्वभाव
निरागस तुझे डोळे
स्वप्नं सुंदरी तू माझी
पण विचार तुझे भोळे
पहावी सजून तुला
माझ्या घराच्या अंगणात
कसं सांगू ग सजनी
तू आहेस मनातल्या मनात
No comments:
Post a Comment