Sunday, April 1, 2012

अश्रूंना त्या गालावर कधीच स्थान नसू दे

वाञ्याचा झंजावात तुझ्या नसानसात भिनू दे,
दिव्याची प्रखर ज्योत तुझ्या मनात तळपू दे.!!

पौर्णिमेच्या चंद्राचे सौंदर्य तुला मिळू दे,
अमावस्येची रात्र मात्र माझ्या वाटेला येऊ दे.!!

आयुष्यातले प्रत्येक सुख तुला अनुभवता येऊ दे,
दुःख मात्र तुझ्या वाट्याचे मला मनात दडवू दे.!!

आनंदाची खळी नेहमीच तुझ्या गालात खिळू दे,
अश्रूंना त्या गालावर कधीच स्थान नसू दे.!!

No comments:

Post a Comment