Wednesday, June 1, 2011

तुझी कविता म्हणजे

तुझी कविता म्हणजे यमक जुळवणं
अन् माझी म्हणजे मनं जुळवणं...
तुझी कविता म्हणजे मीटर बांधणं
अन् माझी मनाचं मुक्त धावणं....
तुझी कविता म्हणजे अर्थ लपवणं
अन् माझी मनाचं दार उघडणं...
तुझी कविता म्हणजे कल्पनेत रमणं
अन् माझी म्हणजे केवळ जगणं.....

No comments:

Post a Comment